पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वरळी परिसरात कडकडीत बंद पुकारलाय. गेला आठवडा भर लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते,अखेर मंगळवारी त्यांची मृत्यूशी झुंज संपली..या घटनेमुळे सकाळ पासूनच वरळी विभागातील दुकाने,कार्यालये आणि बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. झोपी गेलेल्या सरकारला ,पोलिसांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि शिंदे यांच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी हा बंद पाळण्यात आलाय..काही दिवसांपू्र्वी खार इथं दिवसाढवळ्या ऑन ड्युटी असताना शिंदे हल्ला करण्यात आला होता..