Advertisement

'सीता - वॉरियर ऑफ मिथिला'चे प्रकाशन


'सीता - वॉरियर ऑफ मिथिला'चे प्रकाशन
SHARES

प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांच्या 'सीता - वॉरियर ऑफ मिथिला' या रामचंद्र यांच्या जीवनावर आधारीत श्रृंखलेतील दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन गोरेगावमधील ओबेरॉय मॉल येथे बुधवारी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रत्येक महिलेमध्ये सीतेचा अंश असून ही सबलता आपण साजरी करायला हवी. या पुस्तकात सीतेच्या दृष्टीकोनातून रामायणाचा प्रवास उलगडण्यात आला आहे. ही पाच पुस्तकांची श्रृंखला असून पुढील पुस्तकात रावणाचा आढावा घेणार असल्याचे, लेखक अमिश त्रिपाठी यांनी यावेळी सांगितले.

या पुस्तक उद्घाटनाच्या निमित्ताने तरूण पिढी मोठ्या प्रमाणात पौराणिक कथांशी जोडली गेल्याचे ओबेरॉय मॉलमध्ये पाहायला मिळाले. अनेक तरूण मंडळींनी अमिशसोबत संवाद साधून पौराणिक कथांसंबंधी आपला दृष्टीकोन कथन केला. याशिवाय शिवा ट्रायोलॉजीवर देखील लवकरच चित्रपट येणार असल्याचे यावेळी अमिश यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा