अंधारातील स्वगत

 Dadar
अंधारातील स्वगत
अंधारातील स्वगत
अंधारातील स्वगत
अंधारातील स्वगत
अंधारातील स्वगत
See all

माटुंगा - अंधारातील स्वगत या नाटकाचा 5 वा प्रयोग मुंबईत झाला. दादरच्या यशवंत नाट्यमंदिर येथे शनिवार 24 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता हा प्रयोग पार पडला. एका अभिनेत्याचा स्वताशीच सुरू असलेला संवाद म्हणजे हा प्रयोग होता. याची संकल्पना आणि दिग्दर्शन डॉ. प्रसाद भिडे यांनी केलं. प्रयोगात रमेश भिडे, अभिनेत्री अनुराधा केळकर आणि धवल भागवत हे देखील सहभागी झाले होते. भिडे हे 1970-90 या कालखंडात रंगभूमीवर वावरले. प्रभाकर पणशीकर, काशीनाथ घाणेकर, रामचंद्र वर्दे या दिग्गजांबरोबर त्यांनी अभिनयही केलं. या प्रयोगाला सुधांशू घारपुरे आणि विनय मुंडे यांनी संगीताची साथ दिली.

एका अभिनेत्याला कलेच्या माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी, सन्मान आणि पैसा या एहिक लाभापासून त्याची मुक्ती, अशी रीयाजमग्न मनस्थिती मांडण्याचा प्रयत्न या प्रयोगात करण्यात आला. नाटकांमधील गाजलेली स्वगत आणि नाट्यपद या वेळी सादर करण्यात आली.

Loading Comments