Advertisement

भांडुपमध्ये कला महोत्सवाचं आयोजन


भांडुपमध्ये कला महोत्सवाचं आयोजन
SHARES

भांडूप - शुक्रवारपासून भांडुप कोकणनगरमधील मीनाताई ठाकरे मैदानात कला महोत्सव आयोजित करण्यात आलाय. महाराष्ट्रातील संस्कृती इतरांपर्यंत जावी तसंच कलागुणांना वाव मिळावा, असा या कार्यक्रमाचा हेतू आहे. भाजपाचे ईशान्य मुंबई विभाग मंत्री जितेंद्र घाडीगावकर यांनी या महोत्सवाचं आयोजन केलंय. महोत्सवात भव्य कलादालन उभारण्यात आलंय. या दालनात महाराष्ट्रातील हेरिटेज छायाचित्रं आणि कलाशिल्प यांचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. तसंच चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातील दिग्गजांची रांगोळीचित्रंही रेखाटण्यात आलीत. हे प्रदर्शन आणखी दोन दिवस सुरू असेल. शनिवारी नृत्याचे तर रविवारी मराठी तरुणांचे रॉक बँड शोचे कार्यक्रम होतील. या महोत्सवाला भांडुपकरांची चांगलीच गर्दी होते आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement