Advertisement

सामाजिक संस्थांच्या उत्पादनांचे प्रदर्शन


SHARES

परळ - तळागाळात असलेल्या भारतीय सामाजिक संस्थांच्या उत्पादनांना वाव आणि चांगला प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून सोशल सर्व्हिस फेस्टिव्हल 2016 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या फेस्टिव्हलमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन ठेवण्यात आलंय. या कार्यक्रमाचं उद् घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आलं. ना.म. जोशी समाजकार्य प्रशिक्षण वर्ग परळ यांच्यामार्फत या फेस्टिव्हलंच आयोजन करण्यात आलंय. या फेस्टिव्लहमध्ये छोट्यांना आकर्षक करणारा छोटा भीम स्वागतासाठी उभा करण्यात आलाय. फेस्टिव्हलमध्ये 42 स्टॉल्स उभारण्यात आलेत. ड्रेस मटेरियल, साड्यांचे विविध प्रकार, बांबूपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, पर्स, बॅगा, बटवा, चटई, आयुर्वेदिक औषधे, घर सजावटीचे साहित्य, चरक्यावर तयार करण्यात येणारे ब्लॅंकेट, चादर, घोंगडी आदी वस्तू मांडण्यात आल्या आहेत. हा फेस्टिव्हल रविवारपर्यंत असणार आहे. तळागाळात काम करून आपलं उत्पादन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावं हा एकमेव उद्देश या फेस्टिव्हलचा आहे. त्यांच्या या प्रयत्नांना भरभरुन यश यावं हीच सदिच्छा.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा