Advertisement

डॉ. सुभाष पवार यांच्या कलाचित्रांचं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन


डॉ. सुभाष पवार यांच्या कलाचित्रांचं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन
SHARES
Advertisement

चित्रकार, ज्योतिष आणि कलासमीक्षक डॉ. सुभाष पवार यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहलेल्या 'भारतीय चित्रकार आणि ज्योतिष ग्रहयोग' व 'कलयात्री' या पुस्तकांचं प्रकाशन मंगळवारी जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये पार पडलं. यावेळी डॉ. पवार यांच्या 'यंत्र कलासाधना' या विषयावर आधारित असलेल्या कलाचित्रांचं प्रदर्शनही लावण्यात आलं होतं.भारतीय चित्रकारांच्या ग्रहांवर आधारित असलेलं हे पुस्तक चित्रकारांसाठी महत्त्वाचं ठरणार असल्याचं मत ग्रंथाचे लेखक डॉ. सुभाष पवार यांनी मांडलं.

 


'मी गेली ३० वर्ष ज्योतिषचा अभ्यास करतो आहे. हे करत असतानाच ज्योतिष आणि चित्रकार यांच्यावर अभ्यास का करत नाही? असं माझ्या जवळच्या काही लोकांनी मला विचारलं होतं. त्यामुळे मी चित्रकार आणि ज्योतिष यांचा संबंध काय? हे या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक क्षेत्रासाठी वेगवेगळे ग्रह आहेत. त्याप्रमाणे चित्रकारांसाठीही वेगळे ग्रह असतात. या पुस्तकात चित्रकलेचा आणि ज्योतिषीचा इतिहास आहे. विशेष म्हणजे हा प्रबंध एखाद्या पीएचडी करणाऱ्यासाठी गाईडलाईन ठरू शकतो', असं मत डॉ. सुभाष पवार यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केलं.या सोहळ्याला आमदार मंदा म्हात्रे, जेष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, जेष्ठ पचांगकर्ते आणि साहित्यिक दा. कृ. सोमण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


संबंधित विषय
Advertisement