जाहिरात महोत्सवातून जपले सामाजिक भान

  Prabhadevi
  जाहिरात महोत्सवातून जपले सामाजिक भान
  • मुंबई लाइव्ह टीम
  • कला
  मुंबई  -  

  'मंथन आर्ट फाऊंडेशन'चा 'मंथन डूडल सामाजिक जाहिरात महोत्सव' नुकताच प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला प्रांगणात पार पडला. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध छायाचित्रकार पद्मश्री सुधाकर ओलवे यांच्या हस्ते झाले. या महोत्सवामध्ये समाजातील वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे कलाविष्कार बघायला मिळाले.

  महोत्सवात छापील व व्हिडिओ जाहिराती या विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. छापील जाहिरातींमधून सहा स्पर्धक आणि व्हिडिओ जाहिरातींमधून चार स्पर्धकांची निवड करण्यात आली. या स्पर्धेतील विजेते मुंबईतील अनुजा कोनुरे व जळगावचा विजय जैन यांना सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. तसेच इतर विजयी स्पर्धकांनाही महोत्सवात सन्मानीत करण्यात आले.

  यावेळी व्यासपीठावर 'डिजिटल पेंटिंग पोस्टर आर्ट' या क्षेत्रातील तज्ज्ञ राज खत्री, प्रसिद्ध दिग्दर्शक अभिजित पानसे, छायाचित्रकार राजेशकुमार सिंग आणि मंथन आर्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष तसेच प्रसिद्ध कला प्रशिक्षक शशिकांत गवळी आदी उपस्थित होते.

  “कला आणि छायाचित्र या क्षेत्रामध्ये तुम्ही केलेल्या कामावर व मेहनतीवर विश्वास ठेवा, ते यशाच्या स्वरुपात तुम्हाला परत मिळेल,” असे विजेत्या स्पर्धकांचे कौतुक करताना छायाचित्रकार सुधाकर ओलवे म्हणाले. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.