Advertisement

असा साजरा करतात जमशेदी नवरोज!


SHARES

दादर - जमशेदी नवरोज हा पारसी नववर्षाचा प्रथमदिन. खाद्यपदार्थांची चंगळ असलेला जमशेदी नवरोज हा उत्सव दादरमधल्या पारसी कॉलनी जीमखाना इथे जल्लोषात साजरा केला. जमशेदी नवरोज निमित्त मंचेरजी एडुल्जी जोशी मेमोरियल ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

मनचेरजी एडलजी जोशी ममोरियल ट्रस्टचे पेटरन पिरोजा गोदरेज आणि डॉ. तेहेमतन उद्वाडिया यांच्या हस्ते पारसी समुदायातील सदस्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी कॉलनीतल्या बच्चे कंपनीने मनोरंजनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता.

नवरोज म्हणजे काय ?

जमशेदी नवरोज हा पारसी नववर्षाचा प्रथमदिन. पारसी राजा जमशेद यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. नववर्ष तयारीसाठी पारसी बांधव विविध वस्तूंनी घरातील टेबल सजवतात. यामध्ये दूध, वाईन, साखर, मेणबत्ती, सफरचंद, हिरव्या भाज्या अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांनी सजवलेले हे टेबल जमशेदी नवरोज नववर्ष दिवसानंतर पुढील तेरा दिवसांसाठी तसे ठेवण्याची परंपरा आहे. पारसी लोकांची मूळ देवता ही अग्नी आहे. नवरोजच्या दिवशी आग्यारीत जाऊन ते अग्नीची पूजा करतात. तसेच झेंद अवेस्ता या धार्मिक ग्रंथाचं पठणही करतात.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा