Coronavirus cases in Maharashtra: 212Mumbai: 85Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 14Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 35BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

'बघा' अशी दिसते रात्रीची देखणी मुंबई...


'बघा' अशी दिसते रात्रीची देखणी मुंबई...
SHARE

मुंबई नगरी बडी बांका... जशी रावणाची दुसरी लंका... वाजतो डंका, डंका चहूं मुल्की... अशा शब्दांत शाहिरांनी मुंबईचं नेमकं वर्णन केलं आहे. कवी असो, चित्रकार असो वा छायाचित्रकार प्रत्येकाला मुंबईचं सौंदर्य भुरळ घालतं. कुणी शब्दरूपात, कुणी कुंचल्यातून, तर कुणी क्षणचित्रात मुंबईला आपापल्या प्रतिभेनं पकडू पाहतं. असाच यशस्वी प्रयत्न प्रसिद्ध चित्रकार सुरेश भोसले यांनी देखील केलाय. त्यांनी आपल्या अदाकारीतून रात्रीच्या मुंबईचं सौंदर्य कॅन्व्हासवर अत्यंत समर्पकपणे रेखाटलं आहे.  

रात्रीच्या मुंबईचं दर्शन घडविणाऱ्या भोसले यांच्या चित्रांचं प्रदर्शन मंगळवारपासून जहांगीर आर्ट गॅलरीत भरविण्यात आलं आहे. 'डार्क अॅण्ड लाईट्स आॅफ मुंबई' नावाने भरवण्यात आलेलं हे प्रदर्शन १६ आॅक्टोबरपर्यंत रसिकांसाठी खुलं राहणार आहे.मुंबई सकाळी जितकी गजबजलेली आणि गतीमान असते, तितकीच रात्री शांत आणि देखणी दिसते. दिवसा सूर्यप्रकाशात लख्ख दिसणारी मुंबई रात्री दिव्यांच्या झगमगाटात कशी न्हाऊन निघते हे भोसले यांनी जलरंगाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे. मुंबईतील जुन्या इमारती, पर्यटन स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, गाड्या, रेल्वे, समुद्रकिनारे इ. ठिकाणची भोसले यांची चित्रे डोळ्यांचे पारणे फेडतात. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भाऊचा धक्का, वरळी सी फेस, मुंबई मेट्रो, शिवसेना भवन आणि विमानतळाचे रात्रीचे सौंदर्य आपण पाहिले नसेल, तर भोसले यांनी रेखाटलेले चित्र आवर्जून बघा. मुंबईचा काना कोपरा अत्यंत बारकाईने न्याहळत ते कॅन्व्हासवर रेखाटण्याचा प्रयत्न भोसले यांनी केला आहे. म्हणूनच भोसले यांनी रेखाटलेली देखणी मुंबई पाहण्यासाठी रसिकांनी जहांगीर आर्ट गॅलरीला नक्कीच भेट द्यायला हवी.मी लहानपणापासून मुंबईच्या प्रेमात आहे. यापूर्वीही अनेकदा हे शहर मी कॅन्व्हासवर उतरवले आहे. परंतु रात्रीची मुंबई कॅन्व्हासवर उतरवण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. रसिकांनी हे चित्रप्रदर्शन पाहून चांगला प्रतिसाद द्यावा ही विनंती.
- सुरेश भोसले, चित्रकार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या