Advertisement

प्रजासत्ताक दिनानिमित्त बाल चित्रकला स्पर्धा


प्रजासत्ताक दिनानिमित्त बाल चित्रकला स्पर्धा
SHARES

सँडहर्स्ट रोड - उमरखाडी येथील अरुणोदय सोसायटी आणि यंग अरुणोदय गोविंदा पथक यांच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त 3 वर्ग गटानुसार बाल चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रथम वर्ग गट पहिली ते तिसरी, दुसरा चौथी ते सहावी आणि तिसऱ्या गटात सातवी ते महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. यामध्ये जवळापास 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. मागील दहा वर्षांपासून ही स्पर्धा घेतली जाते. शिवमंदिर समितीचे प्रथमेश म्हात्रे, अजय शेलार, प्रकाश खोत, संकेत म्हात्रे, अभिषेक मिसाळ, प्रसाद तावरी आणि सागर शेडगे यांनी स्पर्धा आयोजनात विशेष सहकार्य केले. या स्पर्धेचे निकाल महाशिवरात्रीच्या दिवशी जाहीर केले जातील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement