नैसर्गिक तत्वांवर आधारित चित्रप्रदर्शन

 Andheri
नैसर्गिक तत्वांवर आधारित चित्रप्रदर्शन
नैसर्गिक तत्वांवर आधारित चित्रप्रदर्शन
नैसर्गिक तत्वांवर आधारित चित्रप्रदर्शन
नैसर्गिक तत्वांवर आधारित चित्रप्रदर्शन
नैसर्गिक तत्वांवर आधारित चित्रप्रदर्शन
See all

अंधेरी - नुकत्याच भारतीय कला मोहोत्सवात सहभागी झालेल्या कल्पना दवे यांचं तत्वम या विषयाला अनुसरून चित्रप्रदर्शन भरवण्यात आलंय. अंधेरी पूर्व येथील सहार रोडवर असलेल्या लीला हॉटेलमध्ये २७ ऑक्टोबरपर्यंत दुपारी १२ ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. अग्नि, वायू, पृथ्वी, जल आणि आकाश ही ५ तत्वे असतात. या नैसर्गिक तत्वांवर आधारित कल्पना दवे यांनी कॅनव्हसवर ऑइल पेंट कलरच्या सहाय्याने चित्रं रेखाटली आहेत.

कल्पना दवे या चित्रप्रदर्शनादरम्यान होणाऱ्या विक्रीतून मिळालेली रक्कम अनाथआश्रम किंवा गरजूंना मदत म्हणून दिली जाणार आहे. आतापर्यंत अहमदाबाद, गुजरात, पुणे या शहरांत त्यांचे चित्रप्रदर्शन पार पडले आहे. या चित्रप्रदर्शनात नैसर्गिक तत्वांवर आधारलेली अशी २५ चित्रे त्यांनी रेखाटली आहेत.

Loading Comments