Advertisement

नेहरू सेंटरमध्ये 'फ्यूजन टेक'चे चित्रप्रदर्शन


नेहरू सेंटरमध्ये 'फ्यूजन टेक'चे चित्रप्रदर्शन
SHARES

वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये चित्रकार दीपक पाटील यांच्या 'फ्यूजन टेक'चे चित्रप्रदर्शन भरवण्यात आले आहे. 23 मे पासून 29 मे पर्यंत हे चित्रपदर्शन सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत तुम्हाला पाहता येणार आहे. या चित्रप्रदर्शनात एकूण 60 चित्रांचा समावेश आहे. या चित्रांच्या किंमती 5 हजार रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत आहेत.

या चित्रांमध्ये विष्णू अवतार आणि ग्रेट शिवाजी ही दोन भव्य पेंटिंग्ज आहेत. 5 फूट उंच आणि 8 फूट रुंद असलेली ही दोन पेंटिंग्ज रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. भारतीय राजांचे महाल आणि त्यांची भव्यता, सौंदर्य हे सर्व काही ग्रेट शिवाजी या पेंटिंगमध्ये आपल्याला इथे पहायला मिळणार आहेत. माझगावच्या ताडवाडी येथील दीपक पाटील यांनी चित्रकलेची पदवी 'रहेजा कॉलेज ऑफ आर्ट' इथून घेतली आहे. तसेच पाटील यांनी अॅनिमेशनची पदवी देखील संपादित केली आहे.

पदवी घेतल्यानंतर चित्रकला व्यवसाय म्हणून जपत असताना ब्रश आणि चित्रकलेतील प्रत्येक बाबींवर पाटील यांनी एवढं लक्ष केंद्रीत केलं कि कालांतराने पाटील यांनी रेखाटलेली अनेक चित्रे लोकांना छायाचित्रे वाटू लागली.

सध्या ओबेरॉय हॉटेलमध्ये दीपक पाटील यांनी काढलेली चित्रे लावण्यात आली आहेत. फक्त भारतच नाही तर भारताबाहेरून आलेल्या अनेक पर्यटकांनी पाटील यांच्या चित्रांना दाद दिली आहे. लंडन, स्पेनपासून तुर्कीपर्यंत अनेक देशांमध्ये त्यांची चित्रकला पोहोचली आहे.

महाराष्ट्रातील बहुतेक गॅलरींमध्ये त्यांची चित्रप्रदर्शने झाली आहेत. चित्र प्रदर्शनातून मिळणारे सर्वच पैसे स्वतःकडे न ठेवता पाटील यांनी ऐरावत गॅलरीत झालेल्या चित्रप्रदर्शनाचे पैसे कॅन्सरग्रस्तांना दिले होते. तर नेहरू सेंटरच्या 'मुंबई मेरी जान' या चित्र प्रदर्शनातीला सर्व पैसे 26/11 ला झालेल्या आतंकवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबाला मदत निधी म्हणून दिले होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा