Advertisement

रंगावली परिवारातर्फे रांगोळी प्रदर्शन


रंगावली परिवारातर्फे रांगोळी प्रदर्शन
SHARES

जोगेश्वरी - पूर्वेकडील श्री समर्थ विद्यालय बांद्रेकरवाडी येथे ३३ वर्षांची परंपरा असलेलं रांगोळी प्रदर्शन सुरू आहे. रंगावली परिवारातर्फे आयोजित हे प्रदर्शन १२ नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ५ ते १० या कालावधीत खुलं असेल. रांगोळी प्रदर्शनाचं प्रवेश शुल्क फक्त ५ रुपये अाहे. जोगेश्वरी रंगावली परिवाराचे सदस्य इथे रांगोळी काढतात. प्रदर्शनात ३०पेक्षा जास्त अधिक रांगोळ्या असून वैशिष्ट्य म्हणजे त्यातले मानवी चेहरे. विविध क्षेत्रांतल्या प्रसिद्ध नामांकित व्यक्तींची चित्रं इथे बघायला मिळतात. भूषण वैद्य, प्रणय आणेराव, सूरज लांडगे, सपना लांडगे, अनिकेत विश्वासराव आदींनी काढलेल्या रांगोळ्या आणि चित्रं येथे बघायला मिळतील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा