बंगळुरूतील प्रकाराचा चित्रातून निषेध

 Mumbai
बंगळुरूतील प्रकाराचा चित्रातून निषेध
बंगळुरूतील प्रकाराचा चित्रातून निषेध
बंगळुरूतील प्रकाराचा चित्रातून निषेध
See all

लालबाग - बंगळुरूमध्ये एका तरुणीसोबत विकृत व्यक्तीनं केलेल्या किळसवाण्या प्रकाराचा येथील गुरूकुल स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थिनींनी चित्राद्वारे निषेध केलाय. 

या तरुणीसोबत झालेल्या प्रकाराचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला. महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या व्हिडिओबद्दल देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. ममता दिनाचं औचित्य साधून गुरूकुलच्या मुलींनी हे चित्र रेखाटून या प्रकाराचा निषेध केलाय. या अपराध्यांना जन्मठेपेची शिक्षा करावी, अशी मागणी या चित्रातून करण्यात आली आहे. रेखाटलेलं चित्र पोस्टानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पीडित मुलीला न्याय मिळण्यास त्यामुळे मदत होईल, असं गुरूकुलचे संस्थापक सागर कांबळी यांनी सांगितलं.

Loading Comments