'माझी मुंबई' चित्रकला स्पर्धेचे आयोजन

 wadala
'माझी मुंबई' चित्रकला स्पर्धेचे आयोजन
'माझी मुंबई' चित्रकला स्पर्धेचे आयोजन
'माझी मुंबई' चित्रकला स्पर्धेचे आयोजन
'माझी मुंबई' चित्रकला स्पर्धेचे आयोजन
'माझी मुंबई' चित्रकला स्पर्धेचे आयोजन
See all

वडाळा - आचारसंहिता कधीही लागू शकते म्हणून वडाळ्यात शिवसेनेने 'मुंबई माझी' ही चित्रकला स्पर्धा रविवारी उरकून घेतली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त दरवर्षी स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाही 'माझी मुंबई' ही चित्रकला स्पर्धा महापौर स्नेहल आंबेकर यांच्यावतीने घेण्यात आली होती. माटूंगा फाइव्ह गार्डनमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरसेविका अलका डोके, प्रणिता वाघधरे यांच्यासह पालिका एफ- उत्तर विभागाचे प्रशासकीय अधिकारी किसन केंकरे, शिक्षण निरीक्षक रजनी बिधलांन, परीक्षक म्हणून सहयोगी शिक्षक सुनीलकुमार पांडे, सुरेश वाघमारे, नितीन क्षीरसागर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी मुंबईतील सर्व महानगरपालिका शाळेतील 2030 विद्यार्थ्यांनी तर खासगी अनुदानित शाळा आणि विना अनुदानित शाळेच्या 1586 विद्यार्थ्यानी भाग घेतला होता. ही स्पर्धा इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असल्याने आयोजकांकडून इयत्ते प्रमाणे गटवारी करण्यात आली होती. एकूण चार गट पाडण्यात आले होते. तसेच प्रत्येक गटाला वेगवेगळ्या विषयाबरोबर तीन तासांची वेळही देण्यात आली होती. दरम्यान बाल चित्रकला स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच तारीख निश्चित करून स्पर्धकांना कळविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक सुनीलकुमार पांडे यांनी दिली.
पारितोषिक पुढील प्रमाणे
प्रथम पारितोषिक - 25 हजार रुपये
द्वितीय पारितोषिक - 20 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह
तृतीय पारितोषिक - 15 हजार आणि सन्मानचिन्ह
उत्तेजनार्थ पारितोषिक - 5 रुपये, एकूण 10 पारितोषिक प्रत्येक गटाला मिळणार आहेत.

Loading Comments