• शिका संस्कार भारती रांगोळी
SHARE

दादर - दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर - नायगाव येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवनच्या वतीने मंडळाच्या सभागृहात 17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान रांगोळी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलंय. यात 40 महिलांनी सहभाग घेतलाय.

या वेळी पाच बोटांची रांगोळी, हाताची मूठ करून काढण्यात येणारी रांगोळी, बिंदू, अर्ध आणि पूर्ण गोलाकार, गोलाकार चकली असे अनेक प्रकार शिकवण्यात येत आहेत. या वर्षी लक्ष्मीची पाऊले, गोपदम, समई, कलश, स्वस्तिक हे रांगोळी सजावटीचे मुख्य आकर्षण ठरत असल्याचं प्रशिक्षिका मीरा निंबाळकर यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या