एकाच दालनात दोन चित्रप्रदर्शन

 BDD Chawl
एकाच दालनात दोन चित्रप्रदर्शन
एकाच दालनात दोन चित्रप्रदर्शन
एकाच दालनात दोन चित्रप्रदर्शन
See all

वरळी - 15 ते 21 नोव्हेंबर दरम्यान आर्टिस्ट नेहा बंन्सल आणि अजय दळवी यांचा ग्रुप शो आणि नेहरु सेंटरच्या एका गॅलरीत बाप बेटा हे सोलो चित्रप्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रसिद्ध चित्रकार चंद्रकांत निशीगंध यांच्या 30 चित्रांचा या सोलो प्रदर्शनामध्ये समावेश आहे. या चित्रांच्या किमती 20,000 पासून 60,000 रुपयांपर्यंत आहेत. या चित्रप्रदर्शनाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनात चंद्रकांत निशीगंध यांचा 12 वर्षाचा मुलगा ध्रुव निशीगंध याची काही चित्रे प्रेक्षकांना पहाण्यासाठी ठेवण्यात आलीयेत. त्यामुळे या प्रदर्शनाला बाप बेटा असं नाव दिलंय.

तर एका स्त्री आणि पुरुषाचे जीवन या संकल्पनेवर आधारीत चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आलीत. मनाचे प्रतिबिंब दर्शवण्या-या कलाकृती अजय दळवी यांनी तर नेहा बन्सल यांनी आई आणि मुल यांच्या नात्यावर आधारीत अशी 20 चित्रे विक्रीसाठी ठेवली आहेत. या चित्रांच्या किमती 30 ते 50 हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. या प्रदर्शनात ठेवण्यात आलेलं नेहा बन्सल यांच एक चित्र इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वार्षिक प्रदर्शनासाठी निवड करण्यात आलंय.

Loading Comments