Advertisement

'इरॉस'चा मेकओव्हर, आता 'आयमॅक्स' म्हणून ओळखले जाणार

इरॉसचे बहुतेक काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.

'इरॉस'चा मेकओव्हर, आता 'आयमॅक्स' म्हणून ओळखले जाणार
SHARES

एकीकडे एकेक चित्रपटगृह बंद होत असताना आता चर्चगेट येथील इंग्रजी तसेच हिंदी चित्रपटांचे इरॉस चित्रपटगृह आता लवकरच सुरू होत आहे. इरॉसचे बहुतेक काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. यासोबतच इरॉस आता आयमॅक्स म्हणून ओळखले जाणार आहे. 

स्टॉल, अप्पर स्टॉल आणि बाल्कनी अशी मिळून बाराशेच्या आसपास येथील आसनक्षमता होती. येथे एक मिनी चित्रपटगृहदेखील होते. तेथे काही चित्रपटाचे प्रेस शो होत होते. सन २०१७ मध्ये हे चित्रपटगृह नूतनीकरणासाठी बंद करण्यात आले. त्यानंतर या वर्षीच्या सुरुवातीला हे चित्रपटगृह जमीनदोस्त केले जाईल असे बोलले जात होते.

परंतु ती अफवा ठरली आणि आता हे चित्रपटगृह नव्या स्वरूपात सुरू होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, येथे दोन स्क्रीन असणार आहेत आणि त्याची आसनक्षमता साधारण अडीचशे ते तीनशेच्या आसपास असणार आहे आणि इरॉस लेझर स्क्रीनसह आयमॅक्स म्हणून उघडेल.

अर्थात आयमॅक्स इरॉस नावाने ते सुरू होईल. याबाबत सिनेमा ओनर्स ॲण्ड एक्झिबीटर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष नीतीन दातार म्हणाले, की चित्रपट रसिकांसाठी आणि चित्रपटसृष्टीसाठी ही आनंदाची बाब आहे.

कारण एकीकडे काही चित्रपटगृहे बंद होत आहेत तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत अशा परिस्थितीमध्ये इरॉससारखे महत्त्वाचे चित्रपटगृह सुरू होत आहे याबद्दल त्याच्या व्यवस्थापनाचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.



हेही वाचा

नवी मुंबईत बेलापूर कम्युनिटी सेंटरमध्ये पहिली महिला जिम उभारण्यात येणार

व्यावसायिक गॅस सिलिंडर 7 रुपयांनी वाढला, घरगुती एलपीजीच्या किमतीत...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा