Advertisement

एकाच व्यासपीठावर 28 कलाकारांच्या कलाकृतींची चित्रप्रदर्शनी


एकाच व्यासपीठावर 28 कलाकारांच्या कलाकृतींची चित्रप्रदर्शनी
SHARES

इंडिया आर्ट फिएस्टा या संस्थेच्या वतीने आणि कर्मा पॅशन ऑफ कलर्स ग्रुप ऑफ शो अंतर्गत देशभरातील 28 कलाकारांच्या कलाकृतीचे प्रदर्शन महालक्ष्मी येथे भरवण्यात आले आहे. महालक्ष्मी येथील भुलाभाई देसाई रोड, सिमरोझा कला प्रदर्शनी येथे 2 ते 6 मे दरम्यान सकाळी 11 वाजता हे प्रदर्शन भरवण्यात आले असून, ते सर्वांसाठी खुले असणार आहे. सुप्रसिद्ध कलाकार अच्युत पालव यांच्याहस्ते या चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी अथर्व कॉलेजचे फाऊंडर सेक्रेटरी सुनील राणे, उद्योगपती केविन शहा, श्याम मिरल्लू, संजय मोरे, सुरेखा मिरल्लू, कुमार मेनन आदी मान्यवर आणि कलाकार उपस्थित होते.

‘प्रत्येक चित्रकार संवेदनशील असतो. तो आपले कौशल्य लावून एखादे चित्र रेखाटत असतो. मात्र त्याच्या चित्राला रसिकांनी योग्य न्याय दिला पाहिजे, त्याच्या चित्राला दाद मिळावी एवढीच त्याची माफक अपेक्षा असते. आज एकाच व्यासपीठावर देशातील 28 कलाकारांना संधी उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेची चित्राबद्दलची आवड पाहून नक्कीच रसिक या चित्रांना न्याय मिळवून देतील असा विश्वास श्याम मिरल्लू यांनी यावेळी व्यक्त केला. अच्युत पालव यांच्याहस्ते सर्व कलाकारांना गौरविण्यात आले.

या प्रदर्शनात जळगाव, पुणे, नवी मुंबई, नवी दिल्ली, मुंबई, बांगलादेश आदी भागातील एकूण 28 कलाकार सहभागी झाले असून, त्यांनी साकारलेली मूर्त-अमूर्त चित्रे निसर्ग चित्र आणि शिल्पकृतींचा सुंदर कलाविष्कार रसिकांना पहायला मिळेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा