Advertisement

ब्रश शिवाय रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन


ब्रश शिवाय रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन
SHARES

दिल्लीतील चित्रकार विरेंद्र कुमार यांच्या चित्रांचे 'फ्रॉम द टॉप' हे सोलो प्रदर्शन वरळीच्या नेहरु सेंटरमधील आर्ट गॅलरीत भरविण्यात आले आहे. चित्र म्हटले की अापसूकच डोळ्यांपुढे उभा राहतो कॅन्व्हास आणि विविध आकारांचे ब्रश. मात्र विरेंद्र कुमार यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ही चित्र रेखाटताना कुठेही ब्रशचा वापर केलेला नाही. वेगवेगळ्या वस्तूंच्या सहाय्याने कुमार यांनी या कलाकृती रेखाटल्या आहेत. यावरून त्यांची रंगसंगतीवर असलेली घट्ट पकड अधोरेखित होते.

हे प्रदर्शन 22 मे पर्यंत सुरु रहाणार असून 5 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंतच्या कलाकृतींचा यामध्ये समावेश आहे. हे प्रदर्शन रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत ते पाहता येईल.

यापूर्वी कुमार यांचे चित्रप्रदर्शन दिल्लीतील ललित कला आकादमी येथे झाले होते. त्यांचे मुंबईतील हे पहिलेच चित्रप्रदर्शन असल्याची माहिती त्यांनी दिली.

'विविध वस्तूंच्या साहाय्याने रेखाटलेली ही चित्रे ब्रशने काढलेल्या चित्रांसारखीच असली, तरी काही प्रेक्षक उत्सुकतेने या चित्रांना कापडी किंवा तत्सम वेगळे काहीतरी असल्याचे समजून हात लावून देखील पहातात', असेही कुमार म्हणाले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा