देवीच्या मूर्ती घडवायला सुरुवात

 Pali Hill
देवीच्या मूर्ती घडवायला सुरुवात
देवीच्या मूर्ती घडवायला सुरुवात
देवीच्या मूर्ती घडवायला सुरुवात
See all

मुंबई - मुंबई शहरात अनेक मुर्तीकार आहेत, मात्र सेंचुरी बाजार जवळ असलेल्या गणेश चाळीत राहणारे मूर्तीकार बाळाराम पाटील थोडे वेगळे आहेत. अनेक मूर्तीकार नवरात्रीनिमित्त वाघ सिंहावर आरुढ असलेल्या देवीच्या मूर्ती घडवतात. परंतु मूर्तिकार पाटील यांचा एकवीरा देवीची कोंबड्यावर आरुढ असलेली मूर्ती बनवण्यात विषेश हातखंडा आहे. अनेक कोळी आणि आग्री बांधव आपल्या मंडळाच्या कोंबड्यावर आरुढ असलेल्या चार ते पाच फुटांच्या मूर्ती पाटील यांच्या कार्यशाळेतून बनवून घेतात. यांच्या कार्यशाळेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी फक्त मातीच्या मूर्ती घडवल्या जातात त्याही हातांनी.

सुप्रसिद्ध मुर्तीकार कृष्णा मालवणकर यांच्या कार्यशाळेत 15 वर्षे शिष्य म्हणून काम केल्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर बाळाराम पाटील यांनी 2006 साली स्व:ताची कार्यशाळा सुरु केली. मूर्तीकार कृष्णा मालवणकर हे वयाच्या 80 वर्षापर्यंत मूर्ती घडवण्याचे काम करत होते. गुरुला श्रद्धांजली म्हणून ते आजही बील बुकावर कृष्णा मालवणकर यांचे नाव देतात. सध्या त्यांच्या कार्यशाळेत 3-4 सहकलाकार आहेत. तर पाटील यांचे बालपणापासूनचे मित्र पेण हम्रापूरचे प्रसिद्ध मूर्तीकार दत्तात्रय नागांवकर हे या कार्यशाळेत मूर्ती घडवण्याचे काम करतात. सध्या या कार्यशाळेत 3 ते 5 फुटांच्या मूर्ती घडवण्याचे काम सुरु आहे. 8 हजारांपासून 20 हजार रुपयांपर्यंत या कार्यशाळेत सध्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Loading Comments