Advertisement

‘माझी मुंबई’ बालचित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर


‘माझी मुंबई’ बालचित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर
SHARES

मुंबई - मुंबईचे महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या ‘माझी मुंबई’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेचा निकाल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केला. यामध्ये तीन गटांमध्ये घेतलेल्या या स्पर्धेत ग्लोरिया कॉन्व्हेंट गर्ल्स स्कूलची पूर्वा जगताप, केनिया अँड अँकरची अनुष्का अनिल मुळये आणि ग. न. पुरंदरे शाळेची हिरण्मयी कोळंबे आदींनी प्रथम क्रमांक पटकावला.

महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दिनांक 8 जानेवारी, 2017 रोजी बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व महापालिका शाळा तसेच खासगी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी बालचित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 58 हजार 146 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेचा निकाल मुंबईचे महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला. या वेळी उप महापौर हेमांगी वरळीकर, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा शुभदा गुडेकर, महापालिका उप आयुक्त (शिक्षण) मिलिंद सावंत, शिक्षणाधिकारी महेश पालकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

इयत्ता पहिली ते दुसरीमधील पहिल्या गटात प्रथम क्रमांक पूर्वा जगताप, द्वितीय क्रमांक ओम यादव, तृत्तीय क्रमांक रुचिका परमारने पटकावला. याशिवाय दहा विद्यार्थ्यांची उत्तेजनार्थ निवड करण्यात आली आहे. तर दुसरी ते पाचवी पर्यंतच्या दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक अनुष्का मुळये, दुसरा क्रमांक पी. रत्नेश विश्वचंतेज आणि तिसरा क्रमांक उत्कर्ष जैसवाल यांनी पटकावला आहे. याशिवाय दहा स्पर्धकांची उत्तेजनार्थ निवड करण्यात आली आहे. तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या तिसऱ्या गटात प्रथम क्रमांक हिरण्मयी कोळंबे, दुसरा क्रमांक मीना शर्मा, आणि तृत्तीय क्रमांक शेख मो. कैफ मोसर्रफ हुसैन यांनी पटकावला आहे. शिवाय दहा स्पर्धकांची उत्तेजनार्थ निवड करण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा