Advertisement

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे यांची नियुक्ती

साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या २९ सदस्यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे यांची नियुक्ती
SHARES

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या २९ सदस्यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे.  

त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे. या मंडळाचं अध्यक्षपद डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांच्याकडं सोपवण्यात आलं आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.

 साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य

सदानंद मोरे-अध्यक्ष, डॉ. प्रज्ञा दया पवार, अरुण शेवते, डॉ. रणधीर शिंदे, श्रीमती निरजा, प्रेमानंद गज्वी, डॉ. नागनाथ कोतापल्ले,  प्रविण बांदेकर,  मोनिका मजेंद्रगडकर,  भारत सासणे,  फ.मु.शिंदे, डॉ.रामचंद्र देखणे, डॉ. रविंद्र शोभणे, योगेंद्र ठाकूर,  प्रसाद कुलकर्णी,  प्रकाश खांडगे, प्रा. एल.बी.पाटील,  पुष्पराज गावंडे , विलास सिंदगीकर, प्रा. प्रदीप यशवंत पाटील, डॉ. आनंद पाटील, प्रा. शामराव पाटील,  दिनेश आवटी,  धनंजय गुडसुरकर,  नवनाथ गोरे, रविंद्र बेडकीहाळ, प्रा. रंगनाथ पठारे,  उत्तम कांबळे, विनोद शिरसाठ, डॉ. संतोष खेडलेकर.

विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्य

डॉ.भीमराव उल्मेक, डॉ. श्रीनंद बापट, डॉ.अरुण भोसले, राहुल देशमुख, डॉ. प्रभाकर देव, सतीश आळेकर, हेमंत राजोपाध्ये, सुबोध जावडेकर, आसाराम लोमटे, डॉ. रवींद्र रुक्मिणी रवींद्रनाथ, निखिलेश चित्रे, डॉ. प्रकाश पवार, शर्मिला फडके, डॉ. प्राची देशपांडे, प्राची दुबळे, डॉ. सदाशिव पाटील, प्रा. संजय ठिगळे, डॉ. कृष्णदेव गिरी, डॉ. विशाल इंगोले, डॉ. निंबा देवराव नांद्रे, प्रा. संतोष पवार, मनीषा उगले, भाऊसाहेब चासकर, उल्हास पाटील.



हेही वाचा - 

गुड न्यूज! १ जूननंतर लाॅकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता येणार

  1. आरोग्य सेतूवर आले 'हे' नवीन फिचर, 'असे' ठरेल फायदेशीर
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा