Advertisement

प्रभादेवी, शिवाजी पार्क परिसर होणार सुशोभित


प्रभादेवी, शिवाजी पार्क परिसर होणार सुशोभित
SHARES

दादर- दक्षिण मध्य मुंबईतील प्रभादेवी, शिवाजीपार्क यासारख्या मोक्याच्या ठिकाणातील खराब भिंतीवर विद्यार्थी चित्र रेखाटून भिंती सुशोभित करणार आहेत. या चित्रांतून ही मुलं स्वच्छतेचा संदेश देणार आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रभा-विनायक नवरात्रोत्सव मंडळाने येत्या रविवारी सकाळी 7 ते 11 भिंतीवर चित्र काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. प्रभा-विनायक नवरात्रोत्सव मंडळाचे आयोजक सचिन खाटपे यांनी ही माहिती दिली आहे. सुप्रसिद्ध हस्ताक्षरकार अच्युत पालव आणि कलेमध्ये अनेक पुरस्कार मिळविलेल्या पुण्याच्या जत्रा टीम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी चित्र रेखाटणार असून अनेक सिने कलाकारही या वेळी उपस्थित राहणार असल्याचे सचिन यांनी सांगितलं. या कार्यक्रमात 2 हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. सामाजिक संदेशातून उत्तम चित्र रेखाटलेल्या विद्यार्थ्यांना अच्युत पालव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सामाजिक दृष्टीकोनातून यापुढेही रिंक फुटबॉल, पाखरे येती घरा यांसारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचं मंडळाचे अध्यक्ष सुभाष सारंग यांनी सांगितलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा