या आदिवासींची कला पाहून तुम्हीही चक्रावून जाल!


SHARE

आदिवासी समाजाची संस्कृती आणि कला वैशिष्ट्यपूर्ण आहे. या विशेष कलेची आणि संस्कृतीची ओळख समाजाला व्हावी यासाठी आदिवासींच्या रुढी, परंपरांचं जतन करण्याची आवश्यकता आहे. आदिवासींच्या याच कलेचं जतन करण्याचा विडा उचलला आहे 'वनवासी कल्याण आश्रम' या संस्थेनं. आदिवासींच्या अंगी असणाऱ्या कलेचा वापर करून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी हा वनवासी कल्याण आश्रम या संस्थेचा हेतू आहे. यासाठी आदिवासी युवकांना एकत्रित करून त्यांना कला प्रशिक्षण देण्यात आलं. त्यातून विविध लाकडी कलाकुसर आणि उपयोगी वस्तू बनवण्यात आल्या.निसर्गाच्या ऱ्हासात लोप पावत चाललेल्या औषधी वनस्पती, बांबूंपासून बनवलेले साहित्य, वारली पेंटिंग अशा वस्तूंचं प्रदर्शन यावेळी ठाण्यात भरवण्यात आलं होतं. याशिवाय कागदाच्या लगद्यापासून बनवलेले पेन स्टँड, सुकलेल्या गवतापासून बनवलेले साहित्य, मोहाची फुलं यापासून तयार केलेल्या वस्तू या प्रदर्शनात खास आकर्षण ठरत आहेत.आदिवासींची कला आणि या संस्कृतीचं दर्शन भावी पिढीला व्हावं आणि आदिवासींचं आर्थिक सक्षमीकरण करण्याबरोबरच त्यांच्या कलेचं जतन व्हावं, यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय