Advertisement

चित्रातून साकारली विश्वाची गती


चित्रातून साकारली विश्वाची गती
SHARES

वसईचे प्रसिद्ध चित्रकार सुभाष गोंधळे यांनी 'गती' या शिर्षकांतर्गत भव्य चित्रप्रदर्शन भरविले आहे. या चित्रप्रदर्शनातून गोंधळे यांनी विश्वव्यापी गतिमानता व तिची त्रिकालाबाधित अजरामर व्याप्ती यांचे प्रभावी दर्शन घडवले आहे.

वैश्विक गतिमानता व भारतीय वैदिक संस्कृतीचा प्रभाव याने प्रभावित होऊन 'ब्रम्ह ते ब्रम्हांड' या संकल्पनेवर चित्र रेखाटत गोंधळे यांनी 'गती'च्या अभूतपूर्व कल्पनांचा ऊहापोह केला आहे. 'गती'च्या लयीतून ऐकू येणारा समाधीप्रत चिंतनरुपी नाद व त्यातून निर्माण होणारी ऊर्जा गोंधळे यांनी चित्राद्वारे रेखाटली आहे. या संकल्पनेद्वारे विश्वाची उत्पती, स्थिती व लय यांचासुद्धा त्यांनी विचार केला आहे. ही चित्रमालिका रसिकांचे लक्ष वेधून घेणारी आहे. हे प्रदर्शन वरळीच्या नेहरु सेंटरमध्ये 15 मे पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा