Advertisement

साहित्य संमेलन: ख्रिश्चन व्यक्ती अध्यक्षपदी कशाला? फ्रान्सिस दिब्रिटो यांना हटवण्यासाठी धमक्यांचे फोन

फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड मागे घेण्यासाठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धमकीवजा फोन येत आहेत.

साहित्य संमेलन: ख्रिश्चन व्यक्ती अध्यक्षपदी कशाला? फ्रान्सिस दिब्रिटो यांना हटवण्यासाठी धमक्यांचे फोन
SHARES

उस्मानाबाद इथं होणाऱ्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड मागे घेण्यासाठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना धमकीवजा फोन येत आहेत. याबाबतच्या वृत्ताला साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दुजोरा दिला आहे. 

हिंमत कशी होते?

महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना मंगळवारी दिवसभरात १०० पेक्षा जास्त फोन आले. या फोनवरून काही अज्ञात व्यक्तींनी फादर दिब्रिटो यांची निवड रद्द करण्याची धमकी दिली. एका ख्रिश्चन व्यक्तीला मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष करण्याची तुमची हिंमत कशी होते? असा प्रश्न धमकी देणाऱ्यांनी केला. 

यासंदर्भात बोलताना ठाले पाटील म्हणाले की, “आम्हाला धमक्यांचे फोन येत असल्याची बाब खरी आहे. दिब्रिटो निवडीला विरोध करणारे २० ते २५ फोन मला आले होते. तर काही मिस्ड कॉलही अनोळखी नंबरहून आले होते. आम्ही तुमचा दुर्योधन करु, तुम्हाला पाहून घेऊ अशा प्रकारे धमक्या फोनवरून देण्यात आल्या. मात्र, अशा धमक्यांना न घाबरता आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत.” एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे.

धर्मगुरू असल्यावरून आक्षेप

जानेवारी महिन्यात उस्मानाबादमध्ये हे संमेलन होणार आहे. दिब्रिटो यांच्या नावाची शिफारस पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेने केली होती. या प्रस्तावाला साहित्य महामंडळाच्या इतर घटक संस्थांनी देखील पाठिंबा दिला होता. परंतु साहित्यिक दिब्रिटो ‘धर्मगुरू’ असल्याचा असल्याचं म्हणत काही हिंदुत्ववादी संघटना आणि व्यक्तींनी सोशल मीडियावर या निवडीवर आक्षेप घेतला होता. दिब्रिटो यांच्या ललित व वैचारिक लेखनाकडे दुर्लक्ष करुन केवळ त्यांच्या धार्मिक पुस्तकांचा उल्लेख सोशल मीडियावर ठळकपणे करण्यात आला होता.   



हेही वाचा-

'इथं' मिळेल जुन्या कपड्यांच्या बदल्यात गिफ्ट व्हाऊचर

गणेशोत्सव २०१९ : ब्रिटिशकाळात असं व्हायचं गणपतीचं विसर्जन, पाहा ऐतिहासिक व्हिडिओ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा