Advertisement

वारली चित्रकलेचा अनोखा वारसा!


SHARES

आदिवासी पाड्यांमध्ये जोपासली जाणारी कला म्हणजे वारली पेंटिंग. महाराष्ट्राची लोककला म्हणून आता वारली पेंटिंगची ओळख झाली आहे. आदिवासी पाड्यांमध्ये जोपासली जाणारी ही कला आता पाड्यांपासून शहरांपर्यंत येऊन पोहोचली आहे. मुंबईसारख्या शहरातही वारली पेंटिंग हा एक छंद म्हणून जोपासण्यात येत आहे. पालघरमधल्या बोर्डी येथे राहणाऱ्या अशाच एक चित्रकार आहेत राखी आडगा-साळुंके. राखी यांनी नुकतेच मुंबईतल्या नेहरू सेंटरमध्ये 'आदिवासी कॅनव्हास' या नावानं वारली पेंटिंग्जचं प्रदर्शन भरवलं होतं. 'महाराष्ट्राची लोककला' अशी ओळख असलेल्या वारली पेंटिंगचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. वारली पेंटिंगचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशानं या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा