Advertisement

रोमान्स, थ्रिलरवर आधारित '३ स्टोरीज'


रोमान्स, थ्रिलरवर आधारित '३ स्टोरीज'
SHARES
Advertisement

अर्जून मुखर्जी दिग्दर्शित ३ स्टोरीज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधूनच चित्रपटात वेगवेगळ्या कथा असल्याचं समोर आलं आहे. या एकाच चित्रपटात रोमान्स आणि थ्रिलर दोन्ही गोष्टी बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये मराठी प्रेक्षकांसाठी एक सरप्राईझ असणार आहे. What is Flory waiting for? #3storeystrailertomorrow

A post shared by Renuka Shahane (@renukash710) on


काय आहे सरप्राईझ?

मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे अनेक वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात ती एका वृद्ध महिलेच्या भूमिकेत आहे.


काय आहे सिनेमाची कथा?

या सिनेमात चाळीत राहणाऱ्या लोकांची व्यथा मांडण्यात आली आहे. चाळीत राहणं जेवढं सोपं वाटतं तेवढं ते कठीण असतं हे या चित्रपटातून प्रामुख्याने दाखवण्यात आलं आहे. '३ स्टोरीज' हा सिनेमा येत्या १६ फेब्रुवारी रोजी प्रद्रशित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ट्रेलर शेअर होताच याला हजारो लाईक्स देखील मिळाले आहेत.


या कलाकारांची मुख्य भूमिका

'३ स्टोरीज' या चित्रपटाच अभिनेता शर्मन जोशी, पुलकित स्रमाट, रेणूका शहाणे, रिचा चड्ढा, प्रतिभा, आयशा अहमद, अंकित राठी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

संबंधित विषय
Advertisement