Advertisement

तनुश्रीचे सर्व आरोप खोटे; नानाच्या वकिलांचं महिला आयोगाकडे लेखी उत्तर


तनुश्रीचे सर्व आरोप खोटे; नानाच्या वकिलांचं महिला आयोगाकडे लेखी उत्तर
SHARES

अभिनेते नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता हिच्याकडून लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तनुश्रीनं आपल्यावर लावलेले सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचं असल्याचं लेखी उत्तर महिला आयोगाला नानांच्या वतीनं देण्यात आल्याची माहिती नानांचे वकील अॅड अनिकेत निकम यांनी खास मुंबई लाईव्हशी बोलताना दिली आहे. तर याविषयी महिला आयोगानं मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 


तनुश्रीच्या तक्रारीची दखल

हाॅर्न ओके प्लीज चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नानांनी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. तनुश्रीनं याविरोधात कायदेशीर कारवाई केली असून महिला आयोगाकडेही धाव घेतली आहे. ८ आॅक्टोबरला तनुश्रीनं महिला आयोगाकडे नाना आणि गणेश आचार्य, राकेश सारंग, सामी सिद्धीकी यांच्याविरोधात तक्रार केली होती. तनुश्रीच्या या तक्रारीची दखल घेत आयोगानं दुसऱ्याच दिवशी तनुश्री-नानांसह बाकी लोकांना पत्र पाठवत आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलं होतं. तर दुसरीकडे पोलिसांनाही पत्र लिहित याप्रकरणी काय काय कार्यवाही केली याची माहिती मागवली होती.


लवकरच बाजू मांडू

पोलिसांनी गेल्या महिन्यांतच याप्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा लेखी आढावा आयोगाकडे सादर केला आहे. तर नानांच्या वतीनं अॅड. कदम यांनीही लेखी उत्तराद्वारे आपली बाजू मांडली आहे. हे सर्व आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचं स्पष्टीकरण उत्तरात देण्यात आल्याचं अॅड. कदम यांनी सांगितलं आहे. मात्र त्याचवेळी तनुश्रीकडून मात्र अद्याप बाजू मांडण्यात आलेली नसल्याचं आयोगातील सुत्रांनी सांगितलं आहे. याविषयी तनुश्रीचे वकील अॅड. नितीन सातपुते यांच्याशी मुंबई लाइव्हनं संपर्क साधला असता, त्यांनी तनुश्रीच्या वतीनं लवकरच बाजू मांडू असं सांगितलं आहे. तर नानांच्या उत्तराची प्रत अद्याप मिळाली नसल्याचं सांगत यावर अधिक बोलण्यास नकार दिला आहे. 



हेही वाचा - 

जबरदस्त शैलीत 'मुळशी पॅटर्न'चा खतरनाक ट्रेलर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा