Advertisement

परेश रावल साकारणार 'या' माजी राष्ट्रपतींची भूमिका

परेश रावल यांनी चतूरस्त्र अभिनय कौशल्यानं नायक, खलनायक, सहकलाकार अशा सर्वच भूमिका केल्या आहेत.

परेश रावल साकारणार 'या' माजी राष्ट्रपतींची भूमिका
SHARES

भारताचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दूल कलाम यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक तयार करण्यात येणार आहे. या बायोपिक मुख्य भूमिका म्हणजचे डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांची भूमीका परेश रावल व्यक्तिरेखा साकारणार आहेत. परेश रावल यांनी चतूरस्त्र अभिनय कौशल्यानं नायक, खलनायक, सहकलाकार अशा सर्वच भूमिका केल्या आहेत. कलाम यांच्या भूमीकेबाबत परेश रावल यांनी स्वतः ट्विटरवरून याची माहिती चाहत्यांना दिली.

'माझ्यामते, कलाम हे संत कलाम होते. पडद्यावर कलामांची व्यक्तिरेखा साकारण्याचे संधी मला मिळाल्याने मी फार नशीबवान आहे', असं ट्विटरवर कलामांचा फोटो शेअर करत परेश रावल यांनी लिहिलं आहे.

काम करण्याची इच्छा

डॉ. एपीजे एब्दुल कलाम यांच्या बायोपिकमध्ये परेश रावल स्वतःची छाप कितपत पाडणार? हे येणारा काळच ठरवणार आहे. परंतु, त्यांना पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यास त्यांचे चाहते उत्सुक असतील यात काही शंका नाही. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा रावल यांनी बोलून दाखवली होती. मात्र काही कारणांमुळे त्यांना या सिनेमात काम करता आलं नाही. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयनं मोदी यांची भूमिका साकारली.



हेही वाचा -

जेएनयूतील हल्ला बघून २६/११ ची आठवण झाली- उद्धव ठाकरे

मनसे लोणच्याएवढीही उरली नाही, शिवसेना नेत्याची राज ठाकरेंवर टीका



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा