Advertisement

संजय दत्त कर्करोग मुक्त, मुलांच्या वाढदिवशी चाहत्यांसाठी लिहली भावनिक पोस्ट

६१ वर्षीय संजू पॉझीट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) चाचणीत कर्करोगमुक्त असल्याचं दिसून आलं आहे.

संजय दत्त कर्करोग मुक्त, मुलांच्या वाढदिवशी चाहत्यांसाठी लिहली भावनिक पोस्ट
SHARES

अभिनेता संजय दत्तचा कर्करोग बरा झाल्याची बातमी समोर आली होती. ६१ वर्षीय संजू पॉझीट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) चाचणीत कर्करोगमुक्त असल्याचं दिसून आलं आहे. दोन दिवसांनंतर म्हणजे २१ ऑक्टोबर रोजी त्यानं एका पोस्टच्या माध्यमातून या बातमीला दुजोरा दिला आहे. दोन महिन्यांपूर्वीच संजय दत्तला चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचं निदान झालं होतं.

आपल्या मुलांच्या वाढदिवसादिवशी संजयनं ट्विटरवर ही आनंदाची बातमी शेअर केली. आपल्या पोस्टमध्ये संजयनं लिहिलं की, ''गेले काही आठवडे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. परंतु असं म्हटलं जात की देव सर्वात शक्तिशाली सैनिकाला सर्वात कठीण संघर्षासाठी निवडतो. म्हणूनच आज माझ्या मुलांच्या वाढदिवशी मला खूप आनंद झाला आहे की, मी ही लढाई जिंकण्यात यशस्वी झालो आहे आणि मी हा लढा जिंकून त्यांना सर्वात चांगली भेट देऊ शकलो आहे.''

संजू पुढे म्हणाला, ''आपल्या सर्वांच्या मदतीशिवाय आणि विश्वासाशिवाय हे शक्य झालं नसतं. मी माझ्या कुटुंबातील, मित्र आणि चाहत्यांचा आभारी आहे, जे माझ्या पाठीशी कायम उभे होते आणि जे या कठीण काळात माझे सामर्थ्य बनले. आपल्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद. गेल्या काही आठवड्यांपासून माझी काळजी घेणाऱ्या डॉ. शेवंती आणि त्यांच्या टीमचे मी विशेष आभार मानतो.''हेही वाचा

कंगनाची सोमवारी होणार चौकशी, मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली नोटीस

'बधाई हो'नंतर 'बधाई दो' सिक्वेलची घोषणा, राजकुमार राव-भूमी पेडणेकरची जोडी ठरली

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement