Advertisement

'कौवा बिर्याणी' फेम अभिनेता विजय राजला अटक

'रन' या चित्रपटामधील 'कौवा बिर्याणी' सीनसाठी विजय राज खूप लोकप्रिय झाला होता.

'कौवा बिर्याणी' फेम अभिनेता विजय राजला अटक
SHARES

बॉलिवूड अभिनेता विजय राज याला महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली आहे. विजय राजवर चित्रपटाच्या सेटवर एका महिला कलाकाराचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. विजय विरोधात भादंवि कलम ३५४ (महिलेचा विनयभंग करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या 'शेरनी' या चित्रपटात विजय राजची महत्त्वाची भूमिका आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण मध्य प्रदेशातील बालाघाट इथं सुरू आहे. यासाठी चित्रपटाची टीम विदर्भातील गोंदियात आली होती. चित्रपटाचे सर्व कलाकार गोंदियातील ‘हॉटेल गेटवे’ इथं वास्तव्याला आहेत. येथेच विजय राजनं एका महिला कलाकाराचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.

विजय राजच्या अटकेनंतर 'शेरनी' चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं. या महिलेच्या तक्रारीवरून सोमवारी रात्री रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी पहाटे अभिनेत्याला हॉटेलमधून अटक केली. या प्रकरणात गोंदिया पोलिस काही वेळात निवेदन जारी करू शकतात.

यापूर्वी विजय राजला २००५ मध्ये दुबईमध्ये ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती.

'रन' या चित्रपटामधील 'कौवा बिर्याणी' सीनसाठी विजय राज खूप लोकप्रिय झाला होता. धमाल, वेलकम, दीवाने हुए पागल, रघु रोमियो, मुंबई एक्स्प्रेस, बॉम्बे टू गोवा आणि मान्सून वेडिंग हे त्याचे गाजलेले चित्रपट आहेत. नुकताच तो लुटकेस या चित्रपटात झळकला होता.



हेही वाचा

कंगनाच्या अडचणीत वाढ, जावेद अख्तर यांनी घेतली कोर्टात धाव

'हे' दोन दिवस नेटफ्लिक्स मोफत पाहा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा