Advertisement

पुढच्या वर्षी सुरु होणार 'सिंघम ३'ची शूटिंग, अजय देवगनसोबत दिसणार 'हा' सुपरस्टार

सूर्यवंशी रिलीज झाल्यानंतर रोहित शेट्टी अजय देवगनसोबत ‘सिंघम 3’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे.

पुढच्या वर्षी सुरु होणार 'सिंघम ३'ची शूटिंग, अजय देवगनसोबत दिसणार 'हा' सुपरस्टार
SHARES

२४ मार्च रोजी रोहित शेट्टीचा बहुप्रतिक्षित सूर्यवंशी चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, अशी बातमी समोर येत आहे की सूर्यवंशी रिलीज झाल्यानंतर रोहित शेट्टी अजय देवगनसोबत ‘सिंघम 3’च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. अक्षय कुमारदेखील या चित्रपटात दिसणार असल्याचं बोललं जातंय.

गोलमालनंतर सिंघम हा रोहित शेट्टीचा यशस्वी चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगननं बाजीराव सिंघमची व्यक्तिरेखा साकारली होती, जी प्रेक्षकांना आवडली होती. आता या चित्रपटाचा तिसरा भाग येणार असल्याची चर्चा सुरू आहे. यात सूर्यवंशी म्हणजेच अक्षय कुमारदेखील अजय देवगणसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू आहे. चित्रपटात नायिका कोण असणार हे अद्याप निश्चित केलेलं नाही. यापूर्वी काजल अग्रवाल सिंघम आणि करीना कपूर सिंघम 2 मध्ये झळकली होती.

बातमीनुसार ‘सिंघम 3’चे शूटिंग २०२१ च्या सुरूवातीस सुरू होईल आणि वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट रिलीज होऊ शकेल. २४ मार्च रोजी रिलीज होणाऱ्या रोहित शेट्टी यांच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर, कोरोनाव्हायरसमुळे त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होईल हे सांगणं आता कठिण आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त कॅटरिना कैफ, अजय देवगन, रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार एटीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे.हेही वाचा

तुम्हीच खरे थलायवा! ५० लाखांची मदत

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement