अक्षय कुमारनं आपला आणखी एक नवीन लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ‘मिशन मंगल’ या आगामी हिंदी चित्रपटाचं नवीन पोस्टर अक्षयनं शेअर केलं आहे.
अभिनेता अक्षय कुमारच्या करियरवर एक नजर टाकल्यास अलिकडच्या काळात त्यानं आशयप्रधान आणि विशेषत: देशभक्तीशी निगडीत असलेल्या चित्रपटांवर अधिक लक्ष केंद्रित केल्याचं जाणवतं. आता तो मंगळ ग्रहावर निघाला आहे. अक्शन हिरोच्या रूपात हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री केल्यानंतर कालांतरानं कामेडी चित्रपटांमध्ये रमलेला अक्षय सध्या विषय तसंच आशयप्रधान चित्रपटांसोबतच देशभक्तीपर चित्रपटांमध्येच जास्त दिसतो. ‘स्पेशल २६’, ‘हालिडे’, ‘बेबी’, ‘एअरलिफ्ट’, ‘रुस्तम’, ‘नाम शबाना’, ‘गोल्ड’, ‘केसरी’ आदी अक्षयचे चित्रपट याचीच साक्ष देतात. आता पुन्हा एकदा त्याचा असाच काहीसा अवतार पहायला मिळणार आहे.
या यादीत आता आणखी एका चित्रपटाची भर पडणार आहे. ‘मिशन मंगल’ या चित्रपटात प्रेक्षकांना भारताच्या पहिल्या अंतरिक्ष अभियानाची कहाणी पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील आपला फर्स्ट लुक शेअर करत अक्षयनं लिहिलं आहे की, ही अशा अंडरडॉग्सची कथा आहे, जे भारताला मंगळावर घेऊन गेले होते. ‘मिशन मंगल’ हा भारताच्या अंतरिक्ष अभियानाची खरी कथा सांगणारा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अक्षयचा काहीसा वेगळा लुक पहायला मिळत असून, त्यानं राजीव नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.
हेही वाचा -
प्रभास बनला श्रद्धाचा ‘सायको सैंया’
'दूसरा'साठी समिधा गुरु शिकली राजस्थानी भाषा