Advertisement

अमेयची इमेज ब्रेक करणार 'सेक्रेड गेम्स'

१५ आॅगस्टला नेटफ्लीक्सवर येणाऱ्या 'सेक्रेड गेम्स २'ची उत्सुकता सर्वांनाच आहे. पहिल्या पर्वाप्रमाणं दुसऱ्या सिझनमध्ये बऱ्याच मराठी कलाकारांचा समावेश असणार आहे. दुसऱ्या सिझनमध्ये अमेय वाघही 'सेक्रेड गेम्स' खेळताना दिसणार आहे.

अमेयची इमेज ब्रेक करणार 'सेक्रेड गेम्स'
SHARES

१५ आॅगस्टला नेटफ्लीक्सवर येणाऱ्या 'सेक्रेड गेम्स २'ची उत्सुकता सर्वांनाच आहे. पहिल्या पर्वाप्रमाणं दुसऱ्या सिझनमध्ये बऱ्याच मराठी कलाकारांचा समावेश असणार आहे. दुसऱ्या सिझनमध्ये अमेय वाघही 'सेक्रेड गेम्स' खेळताना दिसणार आहे.


सेक्रेड गेम्स २ मध्ये झळकणार

काही दिवसांपूर्वीच अमेयचा 'गर्लफ्रेड' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्यानं आणि त्याची गर्लफ्रेंड बनलेल्या सई ताम्हणकरनं या चित्रपटाचं जोरदार प्रदर्शन केलं होतं. आता हाच अमेय वेब सिरीजच्या विश्वातील सर्वात यशस्वी मालिका मानल्या जाणाऱ्या 'सेक्रेड गेम्स २'मध्ये झळकणार आहे. बहुचर्चित 'सेक्रेड गेम्स' वेब सीरिजचा दुसरा सीझन १५ आॅगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'सेक्रेड गेम्स'च्या पुढच्या सीझनमध्ये कोण कलाकार असतील हे जाहीर करण्यात आलं असून, मराठमोळा अमेय नेमका कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना असेलच. अमेयनं स्वत:च त्याचं उत्तर दिलं आहे.


खलनायकाच्या भूमिकेत

अमेयनं अगदी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळापासूनच विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. 'फास्टर फेणे' मध्ये हेर, तर 'मुरांबा' आणि 'गर्लफ्रेंड'मध्ये प्रियकराच्या भूमिका साकारल्या आहेत, मात्र 'सेक्रेड गेम्स २'मध्ये तो एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सिरीजच्या पहिल्या पर्वानं बऱ्याच कलाकारांची इमेज ब्रेक करण्याचं काम केलं आहे. दुसरं पर्वही त्याच वाटेनं जाणार असून, अमेय थेट खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'सेक्रेड गेम्स'चा पहिला भाग प्रदर्शित झाल्यांनतर अमेयनं तो एका बैठकीतच संपूर्ण बघितला होता. अशा वेब सीरिजमध्ये काम करायला मिळावं असं तेव्हापासूनच त्याला वाटलं होतं. त्याचं हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे.


नट म्हणून समाधान 

'सेक्रेड गेम्स'च्या निमित्तानं आपलं स्वप्न साकार होण्याबाबत आणि यातील आपल्या भूमिकेविषयी अमेय म्हणाला की, 'सेक्रेड गेम्स'चा भाग असणं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची बाब आहे. मी काही ऑडिशन्स दिल्या आणि माझी एका भूमिकेसाठी निवड झाली. माझा ट्रॅक दिग्दर्शक नीरज घेवान यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेल्या 'मसान' या सिनेमाचा मी फॅन आहे. त्यामुळं अशा दिग्दर्शकाबरोबर काम केल्याचं एक नट म्हणून खूप समाधान मिळालं. 'सेक्रेड गेम्स'मधल्या भूमिकेविषयी इतक्यात फार काही सांगता येणार नाही, पण आजवर न साकारलेल्या व्यक्तिरेखेत मी दिसेन. ती व्यक्तिरेखा काहीशी खलनायकी धाटणीची आहे इतकंच सांगेन.हेही वाचा  -

’मीडियम स्पाइसी’साठी एकत्र आले नीना कुलकर्णी आणि रवींद्र मंकणी

सलमाननं शिवानीला दिला कोणता सल्ला?
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा