'आर्यन मॅन' रॉबर्ट डाउनी ज्युनियर भारतात सर्वाधिक लोकप्रिय हॉलीवुड अभिनेता

हॉलीवुडचा हार्ट थ्रॉब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर भारतीय फिल्म प्रेक्षकांनाही खूप आवडतो, हे नुकत्याच समोर आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवरून सिध्द झालं आहे.

SHARE

हॉलीवुडचा हार्ट थ्रॉब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर भारतीय फिल्म प्रेक्षकांनाही खूप आवडतो, हे नुकत्याच समोर आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवरून सिध्द झालं आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, 'आर्यन मॅन' रॉबर्ट डाउनी ज्युनियर भारतातला सर्वाधिक लोकप्रिय हॉलीवुड अभिनेता आहे. 

लोकप्रिय हॉलीवूड अभिनेता 

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार रॉबर्ट डाउनी ज्युनियरनंतर विल्स स्मिथ भारतातला सर्वाधिक लोकप्रिय हॉलीवूड अभिनेता असल्याचं निदर्शनास आलं आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीनं लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही यादी जाहीर केली आहे. डिजिटल (सोशल प्लेटफॉर्म आणि वेबसाइट), व्हायरल न्यूज आणि न्यूजप्रिंट या सर्वांमध्ये रॉबर्ट डाउनी अग्रेसर असून, त्यांनी १०० गुणांसह लोकप्रियतेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.  

लोकप्रियतेत दुसऱ्या क्रमांकावर

डाउनी यांच्यानंतर 'अलादीन' चित्रपट फेम जिन म्हणजेच अभिनेता विल्स स्मिथनं भारतीयांची मनं जिंकण्याच्या बाबतीत बाजी मारली आहे. स्मिथ ९० गुणांसह लोकप्रियतेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ई पेपर (न्यूज़प्रिंट) आणि व्हायरल न्यूज श्रेणींमध्ये विल्स स्मिथच्या असलेल्या अफाट लोकप्रियतेमुळं स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. फिल्म 'अवेंजर्स'चा थॉर म्हणजेच अभिनेता क्रिस हेम्सवर्थ हॉलीवूड अभिनेत्यांच्या लोकप्रियतेत तिसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियात जन्मलेला अभिनेता हेम्सवर्थचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. याच बळावर त्यानं ७३ गुणांसह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर तिसरं स्थान पटकावलं आहे.

चौथ्या पदावर

आपल्या सुपरहिरो भूमिकांसाठी ओळखला जाणारा अभिनेता क्रिस्टोफर इवांस या लोकप्रियतेच्या यादीत चौथ्या पदावर आहे. डिजिटल (सोशल प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट) श्रेणीमध्ये क्रिस्टोफरच्या फॅन फॉलोविंगमुळं त्याच्याविषयी भरपूर कवरेज दिसून येतं. या 'कॅप्टन अमेरिका'नं ५८ गुणांसह चौथं स्थान पटकावलं आहे. त्या मागोमाग असलेल्या अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओचा मागील बऱ्याच वर्षांपासून भारतात एक चाहतावर्ग आहे. हे फॅन्स लिओनार्डोच्या प्रत्येक चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहतात. त्यामुळं लिओनार्डोच्या फॅनफॉलोविंगमध्ये सातत्य दिसून आलं आहे. ४५ गुणांसह लिओनार्डो डिकॅप्रिओ स्कोर ट्रेंड्स चार्टवर पाचव्या रँकिंगवर आहे.हेही वाचा -

विवाहसोहळा भीमराव-रमाईंचा

बकरी ईदनिमित्त फ्लॅटमध्ये कुर्बानी देण्यास सक्त मनाईसंबंधित विषय
ताज्या बातम्या