Advertisement

विवाहसोहळा भीमराव-रमाईंचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनसंघर्ष सादर करणाऱ्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेनं सुरुवातीपासूनच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता या मालिकेत भीमराव आणि रमाबाईंचा विवाहसोहळा पहायला मिळणार आहे.

विवाहसोहळा भीमराव-रमाईंचा
SHARES

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनसंघर्ष सादर करणाऱ्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेनं सुरुवातीपासूनच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता या मालिकेत भीमराव आणि रमाबाईंचा विवाहसोहळा पहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेत बाबासाहेबांनी केलेल्या संघर्षासोबतच त्यांच्या खासगी जीवनातील महत्त्वाचे टप्पेही सादर करण्यात येत आहेत. रमाबाई या बाबासाहेबांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. बाबासाहेबांचं उच्च शिक्षण असो, आंदोलनं असो वा सत्याग्रह... रमाबाई कायम त्यांच्या पाठीशी सावलीप्रमाणं उभ्या राहिल्या. महापुरुषाची सहचारिणी होण्याचं व्रत रमाबाईंनी मोठ्या निष्ठेनं आणि प्रेमानं जोपासलं. त्यामुळंच रमाबाईंसोबत बाबासाहेबांची लग्नगाठ बांधली गेल्याचा क्षण अतिशय मोलाचा आहे. बाबासाहेबांच्या जीवनातील ते क्षण आता या मालिकेत पहायला मिळणार आहेत.

रमाबाई आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा अध्याय 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेत सुरु होत आहे. याच अध्यायातलं पहिलं पान म्हणजे रामी आणि भीवाचा विवाह. भीवा १४ वर्षांचा आणि रामी ९ वर्षांची असताना दोघं विवाहबंधनात अडकले. हा ऐतिहासिक प्रसंग मालिकेतून अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. पुढील संपूर्ण आठवडा रात्री ९ वाजता हे विशेष भाग प्रेक्षकांना पहाता येतील. यात लहानगी रामी आणि तिच्यापेक्षा वयानं थोडे मोठे असलेले बाबासाहेब यांच्या संसाराला आता सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी काय घडलं तेही मालिकेत दाखवण्यात येत आहे.

भीवाच्या कर्तुत्वाबद्दल रामीला कल्पना असली तरी लग्नापूर्वी दोघांची भेट झाली नव्हती. त्याकाळी तशी प्रथाच नव्हती. त्यामुळे लग्नाच्या दिवशी आपल्या होणाऱ्या पतींना पाहण्यासाठी रामी आतुर झाली होती. हे हळवे क्षण मालिकेत टिपण्यात आले आहेत. अगदी उखाण्यापासून, गृहप्रवेश, नव्या घरात जुळवून घेण्याचा रामीचा प्रयत्न हे भावनिक प्रसंग मालिकेतून पहायला मिळतील. मृण्मयी सुपाळ या मालिकेत बालपणीच्या रमाईंची भूमिका साकारत आहे. १९०७ मध्ये रमाबाई आणि भीमरावांचा विवाहसोहळा भायखळा येथील मासळी बाजारात पार पडला. तो काळ जसाच्या तसा उभा करण्याचा प्रयत्न 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मालिकेच्या संपूर्ण टीमनं केला आहे.

बाबासाहेबांच्या विवाहाप्रसंगी तूफान पाऊस असल्याचा संदर्भ काही पुस्तकांमध्ये आहे. योगायोग असा की 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या मालिकेत विवाहप्रसंग शूट होत असतानाही मुसळधार पाऊस होता. मात्र संपूर्ण टीमच्या योग्य नियोजनामुळं शूटिंग निर्विघ्नपणे पार पडलं. कलाकारांनीही उत्साहानं या सोहळ्याचा आनंद लुटला. भीवाच्या वडिलांची म्हणजेच रामजीबाबांची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद अधिकारी यांनी चाफ्याच्या फुलापासून अंगठी बनवत सर्व कलाकारांना खास भेट दिली. पडद्यावर दिसणाऱ्या या कुटुंबाचं खऱ्या आयुष्यातही घट्ट नातं बनलं आहे.हेही वाचा  -

'गोंद्या'साठी पल्लवी बनली दुर्गाबाई चापेकर

प्रथमेशच्या 'खिचिक'चा टीजर पाहिला का?
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा