Advertisement

'बाहुबली' फेम अभिनेता राणा डग्गुबतीचा मिहिका बजाजसोबत साखरपुडा

हैदराबाद इथं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा झाल्याचं समजतंय.

'बाहुबली' फेम अभिनेता राणा डग्गुबतीचा मिहिका बजाजसोबत साखरपुडा
SHARES

'बाहुबली' या चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता राणा डग्गुबतीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. मिहिका बजाज हे राणाच्या भावी पत्नीचं नाव आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हैदराबाद इथं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दोघांचा साखरपुडा झाल्याचं समजतंय.

राणानं १२ मे रोजी इंस्टाग्रामवर पहिल्यांदा मिहिकासोबतचा फोटो शेअर करुन 'तिनं होकार दिला आहे', अशी रोमँटिक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दोघं लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. आता २० मे रोजी साखरपुडा करुन हे दोघे ऑफिशिअली एंगेज्ड झाले आहेत.

राणानं आपल्या ट्विटर अकाऊंटवर साखरपुड्याचे दोन फोटो शेअर करुन 'And it’s official!!', असं ट्विट केलं आहे. तर मिहिकानेही इंस्टाग्रामवर या खास दिवसाचे फोटो शेअर करुन 'My happy place!', हे कॅप्शन दिले आहे.

View this post on Instagram

My happy place! 🥰🥰 @ranadaggubati

A post shared by miheeka (@miheeka) on


साखरपुड्याला मिहिका पारंपरिक वेशभूषेत अतिशय सुंदर दिसली. राणाने या खास दिवशी पांढरा शर्ट आणि मुंडू परिधान केला होता. राणाचे वडील सुरेश बाबू यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, राणाचं लग्न हिवाळ्यात करण्यात येणार आहे. या लग्नाची तयारीसुद्धा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मिहिका ही बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरची अतिशय जवळची मैत्रीण आहे. सोनमच्या लग्नात मिहिकाने उपस्थिती लावली होती. राणा आणि मिहिकाने त्यांच्या नात्याची कबुली दिल्यानंतर सोनमनं त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मिहिकाने इंटेरिअर डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर ती लंडनला उच्च शिक्षणासाठी गेली. मिहिका बजाज एक इव्हेट प्लानर आहे. ती 'ड्यू ड्रॉप डिजाइन' स्टूडिओची मालकीण आहे. तिचा हा स्टूडिओ मुंबईमध्ये आहे.

मिहिकाच्या अगोदर राणाचं नाव तृष्णा कृष्णन आणि अनुष्का शेट्टी या अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर राणानं दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. २०११ मध्ये त्यानं 'दम मारो दम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो 'हाऊसफूल 4', 'द गाझी अटॅक' आणि 'बेबी' या चित्रपटांमध्ये झळकला. आगामी राणाचा 'हाथी मेरा साथी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्याच्या रिलीज डेट बद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.



हेही वाचा

अनुष्का शर्मा अडचणीत, 'पाताल लोक' वेबसीरिज वादात


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा