Advertisement

आमिर खानने आईचा फोटो केला डिलीट

मिस्टर परफेक्शनिस्ट ट्वीटरवर सक्रिय आहेच. पण आता तो इन्स्टाग्राम अॅपवरही सक्रीय असणार आहे. आमिरने आपल्या अकाऊंटवर पहिली पोस्ट आपल्या आईचा जिनत हुसैन यांचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर त्याने दुसरा फोटो आपला मुलासोबतचा शेअर केला.

आमिर खानने आईचा फोटो केला डिलीट
SHARES

आमिर खानचा ५३ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्यादिवशी आमिरच्या चाहत्यांनी आमिरवर शुभेच्छांचा वर्षाव केला. आमिरने ही आपल्या चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलं. त्याने वाढदिवसादिवशी इन्स्टाग्राम अॅपवर आपलं अकाऊंट सुरू केलं आहे. त्याच्या या रिटर्न गिफ्टमुळे त्याचे चाहते मात्र सध्या खूष आहेत!

मिस्टर परफेक्शनिस्ट ट्वीटरवर सक्रिय आहेच. पण आता तो इन्स्टाग्राम अॅपवरही सक्रीय असणार आहे. अमिरने आपल्या अकाऊंटवर पहिली पोस्ट आपल्या आईचा जिनत हुसैन यांचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर त्याने दुसरा फोटो आपला मुलासोबतचा शेअर केला. 



आमिरचा इन्स्टावर खास अंदाज
इन्स्टाग्राम अकाऊंट हताळताना अमिरचा वेगळा अंदाज बघायला मिळाला. कारण आपण एखादा फोटो पोस्ट करताना जुनी पोस्ट कोणी डिलीट करत नाही. पण आमिरने दुसरा फोटो शेअर करण्यापूर्वी पहिला म्हणजे त्याच्या आईचा फोटो डिलीट केला आहे.



नवीन पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये आमिरसोबत त्याचा मुलगा आझाद पहायला मिळत आहे. आमिरच्या वाढदिवसानिमित्त त्याने स्वत: बनवलेले बर्थडे कार्ड देतानाचा हा फोटो आहे. यावेळी आमिरचा कुत्राही आमिरच्या मांडीवर बसला आहे. 'माझी दोन मुलं, मला वाढदिवसानिमित्त भेटकार्ड देत आहेत', असं सुंदर कॅप्शन या फोटोला आमिरनं दिलं आहे.

१४ मार्चला आमिरने इन्स्टाग्रामवरील अकाऊंट सुरू केलं. आणि अल्पावधीतच लोकांनी आमिरला फॉलो करायला सुरूवात केली. अातापर्यंत आमिरचे पाच लाख ७३ हजार फॉलोअर्स झाले आहेत.



हेही वाचा

नवोदित लेखक, लेखिकांसाठी आमिर खान घेऊन आलाय नवी संधी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा