१९ वर्षांनी सलमान-भन्साळींचं 'रियुनियन'


  • १९ वर्षांनी सलमान-भन्साळींचं 'रियुनियन'
SHARE

निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा उल्लेख येताच प्रत्येक फ्रेम एखाद्या चित्रासारखी भासावी असा दिसणारा चित्रपट बनवणारे दिग्दर्शक ही व्याख्या अनाहुपतणे मनात येते. त्यामुळेच भन्साळी सध्या काय करताहेत, याचं कुतूहल सर्वांनाच असतं. लवकरच ते सलमान खानसोबतच सिनेमा तयार करणार असल्याची माहिती मिळाली आहे.


सर्वोत्कृष्ट संगीतकार

'पद्मावत'नंतर भन्साळी काय करणार? नेमके कोणत्या प्रोजेक्टला सुरुवात करणार? यांसारखे प्रश्न केवळ भन्साळींच्या सिनेमावर प्रेम करणाऱ्या सिनेप्रेमींनाच नव्हे, तर इंडस्ट्रीतील सर्वांनाच पडले होते. त्याचं उत्तर आता मिळालं आहे. भन्साळी आजही 'पद्मावत' सिनेमाच्या यशाचाच आनंद साजरा करत आहेत. नुकतंच त्यांच्या सिनेमाने 'मिर्ची म्युझिक अवॅार्ड'मध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात 'पद्मावत' या सिनेमानं केवळ अल्बम आफ दी ईयरचा पुरस्कार पटकावला नाही, तर भन्साळी यांनाही सर्वोत्कृष्ट संगीतकाराच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे.


वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट

या आनंदमयी वातावरणातून बाहेर पडत भन्साळी यांनी वाढदिवसाचं औचित्य साधत आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. २४ फेब्रुवारी हा भन्साळींचा वाढदिवस आहे. त्या आधी एक दिवस आगामी सिनेमाचे संकेत देत भन्साळींनी आपल्या चाहत्यांना वाढदिवसाचं आगाऊ रिटर्न गिफ्टच दिलं आहे. ही एक लव्ह स्टोरी असल्याचं भन्साळींच्या प्रॅाडक्शन हाऊसकडून सांगण्यात आलं आहे. या लव्ह स्टोरीची नायिका कोण असणार याची घोषणा भन्साळींनी केली नसली, तरी नायकाचं नाव मात्र सांगितलं आहे.
सलमान खान मुख्य भूमिकेत 

या सिनेमात सलमान खान मुख्य भूमिकेत असल्याचं सांगत भन्साळी यांनी सर्वांचीच उत्सुकता वाढवली आहे. यापूर्वी सलमान आणि भन्साळी १९ वर्षांपूर्वी एकत्र आले होते. 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील सलमानचा अभिनय आणि संगीत आजही सर्वांनाच चांगलाच स्मरणात आहे. त्या सिनेमातील ऐश्वर्या राय-बच्चनसोबतची सलमानची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप भावली होती. आता आगामी लव्ह स्टोरीच्या निमित्तानं भन्साळी आणि सलमान यांचं रियुनियन झाल्याचं पाहायला मिळणार आहे.हेही वाचा -

या शिमग्याला राजेश-भूषण आमनेसामने!

वूटवर अतुल सॅाल्व्ह करणार 'द सवाईकर केस'संबंधित विषय
ताज्या बातम्या