Advertisement

RAIDमध्ये अजय देवगणला सर्वाधिक काय भावलं? वाचा एक्सक्लुझिव्ह मुलाखत!


RAIDमध्ये अजय देवगणला सर्वाधिक काय भावलं? वाचा एक्सक्लुझिव्ह मुलाखत!
SHARES

अजय देवगण हे नाव आज बॉलिवूडमध्ये उत्तम अभिनेत्यांच्या यादीत घेतलं जातं. आजपर्यंत अजयने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. अजयने आपल्या कारकिर्दीत अनेक भूमिका या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याच्या साकारल्या. त्यातील 'सिंघम', 'गंगाजल' या चित्रपटांनतर अजय पुन्हा एकदा टीसीरीजच्या आगामी रेड चित्रपटामध्ये सरकारी अधिकारी म्हणून दिसणार आहे.

रितेश शाह यांनी रेड या चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर राजकुमार गुप्ता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. रेडची कथा ही खऱ्या घटनांवर आधारीत आहे. ज्यामध्ये कर्तव्यदश्र अधिकारी हजारो कोटींचा घोटाळा सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. इलियाना डिक्रूज, सौरभ शुक्ला यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. येत्या १६ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.बघुयात या चित्रपटविषयी, त्याच्या प्रवासाविषयी आणि चित्रपटातील रंजक गोष्टींविषयी काय म्हणतोय अजय...


रेड निवडण्यामागे नेमकं कारण काय होतं?

मी अनेक वर्षांपूर्वी ही कथा ऐकली होती. या चित्रपटातील कथेत देशातल्या सर्वात गाजलेल्या घोटाळ्याचा समावेश आहे. 'रेड' ही एक परिपूर्ण कथा आहे. आणि जेव्हा आम्ही ही कथा ऐकली, तेव्हा आम्ही सर्व एकमताने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. मी ही केस हाताळणाऱ्या अधिकाऱ्यालाही भेटलो. RAID केवळ त्या घोटाळ्याच्या घटनेबद्दल बोलत नाही. तर हे घोटाळे उघड करतेवेळी, छापे मारताना त्या व्यक्तीबद्दल, त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल, त्याच्या प्रयत्नांबदद्लही बोलतो.


एक अभिनेता म्हणून चित्रपटात तुझं काय योगदान आहे?

आमचे लेखक, दिग्दर्शक राज आणि रितेश यांनी या कथेसाठी खूप कष्ट घेतले आहेत. एक अभिनेता म्हणून मी माझ्या बाजूने शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे. पण राज हा अनुभवी दिग्दर्शक आहे. त्याला माहितीये की चित्रपटासाठी काय अपेक्षित आहे. तो ते अभिनेत्याकडून काढून घेतो. रेड चित्रपट हे उत्कृष्ट टीम वर्कचे उदाहरण आहे.तू चित्रपट कसा निवडतोस?

मी चित्रपट निवडताना नेहमी एक सामाजिक संदेश प्रेक्षकांना मिळावा असा अट्टहास करत नाही. केवळ प्रेक्षकांचे यातून मनोरंजन होईल हे मी बघतो. परंतु, तो चित्रपट चांगला असेल, याची काळजी मी घेतो. योग्य मार्केटिंगमुळे वाईट चित्रपट चालतात. परंतु, चांगले चित्रपट हे कायमच प्रेक्षकांना आवडतात.


चित्रपटाच्या निर्मितीबद्दल काय सांगशील?

चित्रपटाच्या कथेत मनोरंजन आणि सामाजिक संदेश हे दोन्ही घटक समाविष्ट असतील, त्याची कथा चांगली असेल, तर मी नेहमीच प्रेक्षकांपर्यंत ही कथा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो. मी कधीच गुंतवणुकीच्या दृष्टीने चित्रपटाकडे बघितलं नाही. चांगल्या कथेमुळेच मी मराठी चित्रपटाचीही निर्मिती केली आहे. इलियाना, सौरभ शुक्लाबरोबर काम करतानाचा अनुभव?

इलियाना ही अतिशय साधी आणि मेहनती अभिनेत्री आहे. तिच्याबरोबर काम करताना मजा आली. 'रेड'मध्ये ती केवळ एक गृहिणी नाही, तर खंबीर स्त्री आहे. ती एका अधिकाऱ्याचा आधार आहे. तसेच सौरभबरोबर माझी चांगली केमिस्ट्री जुळली होती. चित्रपटात माझे त्याच्यासोबत अनेक सीन्स आहेत. त्याच्या बोलण्याला एक विनोदी स्पर्श आहे.


रेड नंतर काय?

सध्या मी लव्ह रंजनसह एका चित्रपटासाठी काम करत आहे. त्यानंतर आम्ही 'सिंघम 3' बनवण्यावरही लक्ष केंद्रित करणार आहे. 'सिंघम ३' नंतर 'गोलमाल ५'वर काम करण्यात येईल. त्याचदरम्यान, मी चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यावरही काम करत आहे. मात्र याबद्ल आत्ताच जास्त काही सांगू शकत नाही. लवकरच याविषयी अधिकृत घोषणा करण्यात येईल.हेही वाचा

आता के. के. मेनन मराठीत पदार्पण करणार!


संबंधित विषय
Advertisement