Advertisement

दिलवाला असल्यानेच सर्वांशी प्रामाणिक- धर्मेंद्र

अभिनयाची परिभाषा आणि आजच्या बदललेल्या परिमाणांबाबत धर्मेंद्र म्हणाले की, अभिनय म्हणजे अॅक्शनवर केलेली रिअॅक्शन असते. मी कधीच अभिनय शिकलो नाही. कोणतीही भूमिका केवळ आपल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करत आलो आणि तेच प्रेक्षकांना आवडलं.

दिलवाला असल्यानेच सर्वांशी प्रामाणिक- धर्मेंद्र
SHARES

येत्या ३१ आॅगस्टला धर्मेंद्र, सनी आणि बाॅबी देओल यांचा ‘यमला पगला दीवाना फिर से’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. २०१३ मध्ये सर्वप्रथम आलेल्या ‘यमला पगला दीवाना’ या सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. या सिनेमातील सर्व व्यक्तिरेखा नवीन आहेत. केवळ मुख्य भूमिकेतील कलाकार तेच आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने धर्मेंद्र यांनी केलेली बातचीत...


काय आहे कथा?

‘यमला पगला दीवाना फिर से’ची कथा आणि कॅरेक्टर्सबाबत धर्मेंद्र म्हणाले की, एक केस लढण्यासाठी सनी आणि बाॅबी मला गुजरातमध्ये येण्यास सांगतात आणि या सिनेमाची कथा सुरू होते. आजवर आम्ही बऱ्याचदा पंजाबी फ्लेव्हरमध्ये दिसलो आहोत, पण ‘यमला पगला दीवाना फिर से’मध्ये आमचा गुजराती मूड पाहायला मिळेल. सनीची अॅक्शन, बाॅबीची दीवानगी आणि माझं वेडेपणा या सिनेमात आहे. यात आम्ही गुजराती बोलतानाही दिसू.


दारूसाठी अट्टाहास

सिनेमाच्या ट्रेलरमध्ये धर्मेंद्र दारूसाठी अट्टाहास करताना दिसतात. गुजरातमध्ये दारूबंदी असताना हे कसं हँडल केलंत हे विचारलं असता ते म्हणाले की, या सिनेमात बाॅबी आणि मी दमनमध्ये जाऊन दारू पितो. त्यामुळे गुजरातमधील दारूबंदीला कुठेही धक्का न पोहोचवता एका वेगळ्या मार्गाने आम्ही या सिनेमातील सीन्स चित्रीत केले आहेत.



भूमिका जगलो

अभिनयाची परिभाषा आणि आजच्या बदललेल्या परिमाणांबाबत धर्मेंद्र म्हणाले की, अभिनय म्हणजे अॅक्शनवर केलेली रिअॅक्शन असते. मी कधीच अभिनय शिकलो नाही. कोणतीही भूमिका केवळ आपल्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करत आलो आणि तेच प्रेक्षकांना आवडलं. इंडस्ट्रीमध्ये बदल तर होतच असतात. मी सिनेमा या शब्दावर प्रेम करत असल्याने सिनेयुगातील प्रत्येक पर्व मला आवडतं. आजच्या युगाचीही काही वैशिष्ट्ये आहेत. प्रेक्षकांच्या आवडीनुसार सिनेमे बनत आहेत.


'ही' इच्छा अपूर्णच

इतक्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये धर्मेंद्र यांच्याही काही गोष्टी राहून गेल्या आहेत. ते म्हणतात की, मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो असल्याने आजही त्याच वातावरणात अधिक रुळतो. आजही मी बदललेलो नाही. गावातील धर्मेंद्रच आहे. मेहबूबजींसोबत काम करण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याचं दु:ख होतं. एकदा आमचं बोलणंही झालं होतं, पण योग जुळून आला नाही. त्याचप्रमाणे आसिफसाहेबांसोबत ‘खून महंगा, सस्ता पानी’ हा सिनेमा बनणार होता, पण तो पूर्ण झाला नाही.



'हे' आवडीचे कलाकार

आजच्या काळातील कलाकारांमध्ये धर्मेंद्र यांनी रणवीर सिंग, रणबीर कपूर यांच्या सिनेमांसोबत आमिर खानचा ‘दंगल’ पाहिला आहे. यांची कामगिरी पाहून त्यांना सलाम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. सनी आणि बाॅबीबाबत ते म्हणाले की, सनी खूप इमोशनल आहे. तो जास्त बोलत नाही. तुझ्या मनात काय आहे ते मला सांगत जा असं मी त्याला नेहमी सांगत असतो. त्याने अॅक्शन सिनेमे खूप केले आहेत. बाॅबीचे बरेच सिनेमे रोमँटिक आहेत. रोमांस करताना त्याच्यातील अॅक्शन गायब होते.


'यांच्या'सोबत काम करायचंय

रेखा आणि शत्रुघ्न सिन्हांसोबत पुन्हा काम करण्याबाबत धर्मेंद्र म्हणाले की, रेखा आणि शत्रुघ्न यांच्यासोबत काम करताना पुन्हा ते जुने दिवस परतल्याचा भास झाला. शूटिंगमध्ये जान आल्यासारखं वाटलं. खूप धमाल केली. हेमा मालिनी यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची इच्छा असली तरी कथा मिळणं कठीण असल्याचं धर्मेंद्र म्हणाले.


बायोपिकचा जमाना

सध्या बायोपिकचा जमाना आहे. धर्मेंद्र यांना जेव्हा त्यांच्या बायोपिकबाबत विचारलं तेव्हा ते म्हणाले की, अद्याप काही विचार केलेला नाही. माझ्या जीवनात बायोपिक बनण्यासारखं तसं काही नाही. त्यामुळे तो बनेल की नाही हे वेळच ठरवेल. माझ्यासारखा पवित्र रोमांस अन्य कोणीही केला नसेल. मी दिलवाला असल्याने सर्वांशीच प्रामाणिक राहिलो आहे.



हेही वाचा-

‘मंटो’साठी अहमदाबादमध्ये वसवलं पाकिस्तान

भारतीय हाॅकीतल्या ‘गोल्ड’न क्षणांची आठवण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा