Coronavirus cases in Maharashtra: 202Mumbai: 77Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 13Pimpri Chinchwad: 12Kalyan: 7Navi Mumbai: 6Thane: 5Yavatmal: 4Vasai-Virar: 4Ahmednagar: 3Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 7Total Discharged: 34BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

‘झूठा कहीं का’ म्हणत परतले ऋषी कपूर

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर मागील काही महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. उपचारानंतर आजारपणातून सावरत असलेले ऋषी रूपेरी पडद्यावरही पुनरागमन करत आहेत.

‘झूठा कहीं का’ म्हणत परतले ऋषी कपूर
SHARE

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर मागील काही महिन्यांपासून अमेरिकेत उपचार घेत असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. उपचारानंतर आजारपणातून सावरत असलेले ऋषी रूपेरी पडद्यावरही पुनरागमन करत आहेत.


१९ जुलैला प्रदर्शित 

मागील बऱ्याच दिवसांपासून उपचार घेत असलेल्या ऋषी कपूर यांना जवळपास अर्धी हिंदी चित्रपटसृष्टी भेटून आली आहे. वैद्यकीय उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या ऋषी यांचं मनोबल वाढवण्याचं काम चंदेरी दुनियेतील स्टार्स आणि तंत्रज्ञांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आपलेपणानं त्यांनी केलेल्या चौकशीमुळं ऋषी यांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा होत आहे. अशातच ऋषी कपूर यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘झूठा कहीं का’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. १९ जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 दोन तरुणांची कथा

खरं तर १९७९ मध्येही ‘झूठा कहीं का’ असं शीर्षक असलेला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात ऋषी कपूर आणि नीतू सिंग या रिअल लाईफ जोडीनं मुख्य भूमिका साकारली होती. रवी टंडन यांनी त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. त्यात राकेश रोशन यांचीही भूमिका होती. नवीन ‘झूठा कहीं का’चं दिग्दर्शन समीप कांग यांनी केलं आहे. श्रेया श्रीवास्तव आणि वैधव सुमन यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना अशा दोन तरुणांची कथा पहायला मिळणार आहे, ज्यांना शिक्षणासाठी माॅरीशसला जायचं आहे.


पहिलं पोस्टर प्रदर्शित

या चित्रपटात ऋषींसोबत ओमकार कपूर, सनी सिंग, जिमी शेरगिल, लिलेट दुबे, ऋचा वैद्य, अशोक पाठक आणि मनोज जोशी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपटाचा जुन्या चित्रपटाशी काही संबंध आहे का ते ठाऊक नाही. ऋषी यांच्यावर अद्यापही उपचार सुरूच आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यत ते जर घरी परतले तर त्यांच्या चाहत्यांसाठी यापेक्षा मोठी आनंदाची बातमी कोणतीच नसेल.हेही वाचा -

Movie Review : घटनेतील कलमाआधारे जातीव्यवस्थेवर प्रहार

तमन्ना बनली नवाजुद्दीनची नायिका
संबंधित विषय
ताज्या बातम्या