Advertisement

चित्रपटांची पायरसी कराल, तर 3 वर्ष तुरुंगात जाल

पायरसीमुळे सिनेमांच्या पहिल्या दोन दिवसांच्या कमाईचे आकडे येण्यापूर्वीच, अनेक बिग बजेट सिनेमांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच की काय, पायरसीला रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने कठोर पावले उचलत सिनेमॅटोग्राफी कायदा 1952 मध्ये घटनादुरुस्ती करण्यास मंजुरी दिली आहे.

चित्रपटांची पायरसी कराल, तर 3 वर्ष तुरुंगात जाल
SHARES

चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांपासून दिग्दर्शक, निर्माते आणि साऱ्या कलाविश्वासाठी पायरसी ही एक मोठी समस्या आहे. पायरसीमुळे अनेक बिग बजेट सिनेमांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच की काय, पायरसीला रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रालयानं कठोर पावलं उचलत सिनेमॅटोग्राफी कायदा 1952 मध्ये घटनादुरुस्ती करण्यास मंजुरी दिली आहे.


पायरसी विरोधात केंद्रसरकारची भूमिका

नुकतेच प्रदर्शित झालेल्या ‘ठाकरे’, ‘मणकर्णिका’ आणि अनिल कपूर यांच्या ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे सिनेमे ऑनलाईन लीक झाल्यामुळे निर्मात्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या आधीही अनेक नामकिंत आणि थेअटरवर गल्ला करणाऱ्या सिनेमांना पायरसीचा फटका बसला होता. त्यामुळे पायरसी करणाऱ्यांविरोधात केंद्र सरकारनं आता कडक पावलं उचलत, गुन्ह्यांच्या शिक्षेत वाढ करण्यासाठी घटनादुरूस्तीस मंजुरी दिली आहे.


तीन वर्षाची शिक्षा आणि दहालाख दंड

पायरसी करणाऱ्यांना कमीत कमी तीन वर्षांची शिक्षा किंवा 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. संबंधित निर्मात्यांच्या परवानगीशिवाय रेकॉर्डिंग करणं किंवा प्रसारित करणं हा देखील गुन्हा ठरणार आहे. नुकतेच याबाबतच्या प्रस्तावाला केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी मंजुरी दिल्याचं ट्विट संचालक सुधांशू कर यांनी केलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं प्रोड्युसर्स गिल्ड या संघटनेनं स्वागत केलं आहे. त्यामुळे ऑनलाईन पायरसीला नक्कीच आळा बसणार आहे.



हेही वाचा

‘ठाकरे २’चा दिग्दर्शक अभिजीत (पा) नसे?

मासे खाणं सोनू निगमला पडलं महागात



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा