Advertisement

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचं निधन

वयाच्या ८१ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचं निधन
SHARES

शोले या सगळ्यात गाजलेल्या सिनेमातील सुरमा भोपाली म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता जगदीप यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डायरेक्टर अनुभव सिन्हा यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

जगदीप यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू पसरवली आहे. ‘शोले’ चित्रपटातील सूरमा भोपालीच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती. त्याचं खरं नाव सय्यद इश्तियाक जाफरी आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी हा जगदीप यांचा मुलगा आहे.

अनेक कलाकारांनी ट्विटरवर दु:ख व्यक्त केलं आहे. अजय देवगणनं लिहिलं आहे की, "जगदीप साहेब यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झालं. त्यांना पडद्यावर पाहून आनंद व्हायचा. प्रेक्षकांना त्यांनी खूप आनंद दिला आहे. जावेद आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो."

जगदीप यांचा जन्म २९ मार्च १९३९ रोजी ब्रिटिश इंडिया इथं दतिया सेंट्रल प्रोव्हिंगमध्ये झाला. १९५१ मध्ये बालकलाकार म्हणून जगदीप यांनी 'अफसाना' चित्रपटाद्वारे सिने जगतात प्रवेश केला. कॉमेडियन म्हणून त्यांनी 'दो बिघा ज़मीन' या सिनेमातून पदार्पण केलं.

अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. पण १९७२ मधील 'अपना देश', १९७५ मधील 'शोले'  आणि १९९४ च्या 'अंदाज अपना अपना'मधील अभिनयानं चाहत्यांवर त्यांनी स्वत:ची वेगळी छाप सोडली. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.



हेही वाचा

Dil Bechara Trailer: सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं निधन

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा