‘खलनायक’ जोडीचा ‘कलंक’मधील लुक

१९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक रमेश सिप्पींच्या ‘जमीन’ या सिनेमात प्रथमच एकत्र दिसलेले माधुरी दीक्षित आणि संजय दत्त पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या जोडीचा ‘कलंक’ या आगामी सिनेमातील हा खास लुक…

SHARE

१९८७ मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक रमेश सिप्पींच्या ‘जमीन’ या सिनेमात प्रथमच एकत्र दिसलेले माधुरी दीक्षित आणि संजय दत्त पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या जोडीचा ‘कलंक’ या आगामी सिनेमातील हा खास लुक…


पुन्हा एकत्र

माधुरी दीक्षित आणि संजय दत्त या जोडीनं यापूर्वी बरेच सिनेमे गाजवले आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘टोटल धमाल’ या सिनेमातही दोघांनी एकत्र धमाल केल्याचं पाहायला मिळालं. आता दिग्दर्शक अभिषेक वर्मनच्या आगामी ‘कलंक’मध्ये पुन्हा दोघे एकत्र दिसणार आहेत. या दोघांच्या यापूर्वीच्या सिनेमांबद्दल बोलायचं तर ‘खलनायक’, ‘थानेदार’ आणि ‘साजन’ या गाजलेल्या सिनेमांखेरीज माधुरी-संजयनं ‘महानता’, ‘जय देवा’, ‘साहिबां’, ‘खतरों के खिलाडी’, ‘इलाका’, ‘कानून अपना अपना’ आदी सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.


१७ एप्रिलला प्रदर्शित

करण जोहरची निर्मिती असलेल्या ‘कलंक’मध्ये माधुरीनं बहार बेगमची भूमिका साकारली आहे, तर संजय दिसणार आहे बलराज चौधरीच्या भूमिकेत. पिरीयड ड्रामा असलेला हा सिनेमा १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या दोघांखेरीज या सिनेमात सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य राय कपूर, कुणाल खेमू, हितेन तेजवानी आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. याखेरीज कियारा आडवाणी आणि कृती सेनन पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत.


१५ वर्षांपूर्वी कथा

करण जोहरचे वडील यश जोहर यांनी या जवळजवळ १५ वर्षांपूर्वी या सिनेमाची कथा लिहिली होती. खरं तर करणला हा सिनेमा वडीलांच्या हयातीत बनवायचा होता, पण काही कारणांमुळं ते शक्य झालं नाही. त्या वेळी जर हा सिनेमा बनला असता तर बहार बेगमच्या भूमिकेत माधुरीच्या जागी श्रीदेवी झळकली असती, पण म्हणतात ना प्रत्येक सिनेमाचं आपलं नशीब असतं, ते खोटं नाही. ‘कलंक’चं नशीब त्याला २०१९ मध्ये घेऊन आलं आणि त्यामुळंच कदाचित पुन्हा एकदा संजय-माधुरी एकत्र आले असावेत.हेही वाचा -

EXCLUSIVE : तावडेंचा शुभंकर बनला रिंकूचा हिरो!

परीक्षा संपली आणि 'ती' परतली...संबंधित विषय
ताज्या बातम्या