Advertisement

महेश भट्ट यांनी ‘जिलेबी’ खाऊन साजरा केला वाढदिवस

वाढदिवसाला जिलेबी म्हणजे काहीसं आॅड कॅाम्बिनेशन... पण ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांनी जिलेबी खाऊन आपला ७० वा वाढदिवस साजरा केला.

महेश भट्ट यांनी ‘जिलेबी’ खाऊन साजरा केला वाढदिवस
SHARES

वाढदिवस म्हटला की केक हवाच. त्यातल्या त्यात एखाद्या नावाजलेल्या व्यक्तीचा वाढदिवस म्हणजे केकच्याही पलिकडे बऱ्याच काही गोष्टींचं आयोजन असतं, पण वाढदिवसाला जिलेबी म्हणजे काहीसं आॅड कॅाम्बिनेशन... पण ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांनी जिलेबी खाऊन आपला ७० वा वाढदिवस साजरा केला.


‘जलेबी’ प्रदर्शनासाठी सज्ज

महेश भट्ट यांनी वाढदिवसाचा केक कापला, पण त्यासोबतच जिलेबीही खाल्ली आणि इतरांनाही भरवली. कारण योगच तसा होता. महेश भट्ट यांची निर्मिती असलेला ‘जलेबी’ हा हिंदी सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. वाढदिवसाचं औचित्य साधत भट्ट यांनी १२ आॅक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या आपल्या सिनेमाचंही प्रमोशन केलं आहे. हा सिनेमा अनोख्या टीझर पोस्टरमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे.


यांच्यासोबत कापला केक

‘जलेबी’मध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या वरुण मित्रा आणि रेहा चक्रवर्ती यांच्यासोबत महेश भट्ट यांनी केक कापला. त्यानंतर वरुण आणि रेहा या दोघांनाही जिलेबी भरवली. स्वत:ही जिलेबीवर यथेच्छ ताव मारला. या निमित्ताने त्यांनी एकप्रकारे आपल्या सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवातच केली आहे. पुष्पदीप भारद्वाज यांनी ‘जलेबी’चं दिग्दर्शन केलं असून, कौसर मुनीर यांच्यासोबत त्यांनी लेखनही केलं आहे. या सिनेमात दिगांगना सूर्यवंशी, आन्या दुरेजा, पूर्ती आर्या, सोनाली सूदान, फरीदा दादी, युसूफ हुसैन, अर्जुन कनुंगो आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.


हेही वाचा - 

समलैंगिकतेवरील निर्णयाचं बॉलिवूडकडून स्वागत

इन्स्टावर श्रद्धा बनली लोकप्रिय ‘स्त्री’!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा