Advertisement

तीन भागांमध्ये बनणार 'रामायण'

रामानंद सागर यांनी छोट्या पडद्यावर सादर केलेल्या 'रामायण' या मालिकेच्या आठवणी आजही रसिकांच्या मनात ताज्या आहेत. मागील काही दिवसांपासून मोठ्या पडद्यालाही 'रामायण'चे वेध लागले असून, हे 'रामायण' तीन चित्रपटांच्या भागात पहायला मिळणार आहे.

तीन भागांमध्ये बनणार 'रामायण'
SHARES

रामानंद सागर यांनी छोट्या पडद्यावर सादर केलेल्या 'रामायण' या मालिकेच्या आठवणी आजही रसिकांच्या मनात ताज्या आहेत. मागील काही दिवसांपासून मोठ्या पडद्यालाही 'रामायण'चे वेध लागले असून, हे 'रामायण' तीन चित्रपटांच्या भागात पहायला मिळणार आहे.


मोठ्या पडद्यावर रामायण 

होय, भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आणि रसिकांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे. भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या 'रामायण' या महान ग्रंथावर चित्रपट बनवण्याची प्राथमिक तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. 'रामायण'सोबत 'महाभारत' या ग्रंथावरही चित्रपट बनणार असल्याच्या बातम्या मागील काही महिन्यांपासून येत होत्या, पण अधिकृत घोषणा करण्याच्या बाबतीत 'रामायण'नं बाजी मारली आहे. लवकरच 'रामायण'ला सुरुवात करण्यात येणार असल्याचं समजतं. त्यामुळं प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर रामायण पाहण्याची संधी मिळणार आहे.


बजेटही मोठं

'रामायण'सारख्या विषयावर चित्रपट बनवणं हे खूप मोठं काम असून, त्याचं बजेटही तितकंच मोठं असणार आहे. यासाठी भारतीय चित्रपटसृष्टीतील अल्लू अरविंद, मधू मंटेना आणि प्राइम फोकसचे नमित मल्होत्रा यांनी पुढाकार घेतला आहे. या तिघांनी एकत्रितणे 'रामायण'ची निर्मिती करण्याचा निश्चय केला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा 'दंगल' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आणि 'मॅाम' चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या दिग्दर्शक रवी उदयवार यांच्याकडं सोपावण्यात आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील हे दोन आघाडीचे दिग्दर्शक तीन भागांमध्ये 'रामायण' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर चितारणार आहेत.


थ्रीडी फॅारमॅटमध्ये शूट

हा चित्रपट थ्रीडी फॅारमॅटमध्ये शूट करण्यात येणार असून, हिंदीसह तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाची पहिली घोषणा झाल्याबरोबर यात राम-सीता कोण बनणार? याबाबत उत्सुकता वाढणं सहाजिक आहे, पण अद्याप या चित्रपटातील कलाकारांची निवड करण्यात आलेली नाही. चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांची या चित्रपटासाठी निवड करण्यात येणार असल्याचं समजतं. या चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रदर्शित करण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे.



हेही वाचा -

मराठीतला पहिलाच प्रयोग, ३० हून अधिक कलाकारांनी गायलं 'स्माईल प्लीज'चं अँथम साँग

आशाताईंना तोड नाही, ८६ व्या वर्षी गायलं रोमँटीक साँग




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा