Advertisement

दिशा सालियन आत्महत्या प्रकरण : खटला सीबीआयकडे सोपवण्यास न्यायालयाचा नकार

दिशाच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी सुशांतचा देखील मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर दोघांचाही मृत्यूमध्ये काही तरी समान धागा आहे असा संशय दिल्लीतील एक वकिल पुनीत दांडा यांनी व्यक्त केला होता.

दिशा सालियन आत्महत्या प्रकरण : खटला सीबीआयकडे सोपवण्यास न्यायालयाचा नकार
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियान हिच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. याबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

दिशाच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी सुशांतचा देखील मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर दोघांचाही मृत्यूमध्ये काही तरी समान धागा आहे असा संशय दिल्लीतील एक वकिल पुनीत दांडा यांनी व्यक्त केला होता. या प्रकरणाची सीबीआय चौकशी देखील केली जावी यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना म्हटलं की, कोणाकडे या प्रकरणावर आधारित काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे सोपवावे.

दिशा सालियन हिने ८ जून रोजी इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. ११ जून रोजी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. त्यामुळे बऱ्याच शंका उपस्थित केल्या जात आहेत.  पण त्या रात्री नेमकं काय घडलं होतं, हे तिच्या एका मैत्रिणीने सांगितलं आहे. दिशाच्या घरी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला दिशा, तिचा होणारा पती रोहन, आणि मित्र हिमांशू, नील व दीप हे उपस्थित होते.

पार्टीत सर्वांनी मद्यपान केलं होतं. मद्यपानानंतर दिशा फार भावूक झाली आणि तिची कोणाला काळजीच नाही असं वारंवार बोलत होती. त्यानंतर रात्री तिने युकेतील एका मित्राला फोन केला. फोनवर ती रडू लागली होती. त्यानंतर दिशा दुसऱ्या रुममध्ये गेली आणि दरवाजा आतून बंद करून घेतला. बराच वेळ दिशा बाहेर न आल्याने तिच्या मित्रांनी दरवाजा तोडला. पण रुममध्ये दिशा नव्हती. जेव्हा हिमांशू आणि दीपने खिडकीतून खाली पाहिलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. सर्वजण खाली धावत गेले पण तोपर्यंत दिशाचा मृत्यू झाला होता.हेही वाचा

पालिकेनं NFDC सोबतचा ‘हा’ करार मोडला

26/11 Attack : कसाबविरोधात साक्ष देणाऱ्या 'तिला' न्याय कधी मिळणार?Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement